भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्रोने विविध पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली असून, या माध्यमातून 'सायंटिस्ट/इंजिनिअर SC' पदाच्या एकूण १७५ जागा भरल्या जाणार आहेत.
पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावी.
रिक्त पदाचा तपशील :
या भरतीमध्ये सायंटिस्ट/इंजिनिअर 'SC' (इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या 99 जागा, मेकॅनिकलच्या 52 जागा, तर कॉम्प्युटर सायन्सच्या 21 जागा आहेत. याशिवाय PRL अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या तीनही शाखांसाठी प्रत्येकी 1 जागा उपलब्ध आहे.
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी संबंधित शाखेत किमान 65 टक्के गुणांसह B.E./B.Tech पदवी आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी B.E./B.Tech (Electronic & Communication), मेकॅनिकल पदासाठी B.E./B.Tech (Mechanical), तर कॉम्प्युटर सायन्स पदासाठी B.E./B.Tech (Computer Science) पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
वयोमर्यादा किती?
16 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क किती?
या भरतीसाठी अर्ज शुल्क ₹750 आहे. मात्र परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार शुल्काचा काही भाग परत केला जाणार आहे. GEN/OBC/EWS उमेदवारांना ₹500, तर SC/ST/PWD/ExSM उमेदवारांना ₹750 प्रक्रिया शुल्क परत केले जाईल.अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना स्तर १० नुसार ₹५६,१०० इतके मूळ मासिक वेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता, कॅन्टीन सुविधा यांसारखे भत्ते आणि इतर लाभही दिले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.