उसनवारी तत्वावरील सांगली सिव्हिलचा 'लॅब सहाय्यक' की भ्रष्टाचाराचा 'किंगपिन'? शासनाच्या पगारसोबत खाजगी लॅबचा धंदा जोरात
सांगली :- शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून एकाच ठिकाणी प्रतिनियुक्तीचे बिऱ्हाड ठोकून बसलेल्या सांगली वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) एका वादग्रस्त लॅब सहाय्यकाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अनुकंपा तत्त्वावर नोकरीत आलेल्या या कर्मचाऱ्याने सिव्हिल हॉस्पिटलला स्वतःची खासगी जहागीर समजून गैरव्यवहारांचा कळस गाठला आहे.
शासकीय पावती पुस्तकाची चोरी अन् अपहार पचवला
या महाशयांनी काही वर्षापूर्वी चक्क शासनाचे अधिकृत पावती पुस्तक चोरून हजारो रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार घडला होता. मात्र, तत्कालीन वरिष्ठांशी आर्थिक व्यवहार करून चौकशीचा फारस दाखवत हे प्रकरण सोयीस्करपणे दडपून टाकण्यात आले. शासकीय कागदपत्रांची चोरी आणि पैशांची अफरातफर करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या कर्मचाऱ्याची अरेरावी अधिकच वाढली.या कर्मचाऱ्याला नियमांची पायमल्ली करू प्रयोगशाळा सहाय्य्क पदी बडती देऊन याच्या अरेरावीची व काळ्या करणं्यांना जुणू प्रोत्साहनं दिले. हे कमी की काय म्हणून बढतिने मिरज सिव्हिल येथे नेमणूक असतांना त्याला पुनःश्च सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रतिनियुकितने नेमणूक
केली आहे.
माजी वैद्यकीय अधीक्षकांच्या वरदहस्ताने त्यांच्याच खाजगी रुणालयात नोकरी?
पावती पुस्तक प्रकरणातून सहीसलामत सुटल्यानंतर या कर्मचाऱ्याने तात्कालीन वैद्यकीय अधीक्षकांना हाताशी धरून त्यांच्याच खाजगी रुग्णालयात थेट नोकरी पत्करली. "वैद्यकीय अधीक्षकच माझ्या खिशात आहेत, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही," अशा आविर्भावात वावरणाऱ्या या कर्मचाऱ्याची हिंमत एवढी वाढली की, त्याने सांगलीत दुसऱ्याच्या नावाने स्वतःची खाजगी 'लॅब' थाटली!
रुग्णांची लूट अन् रक्त नुमुण्याचा गोरखधंदा
शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या सेवेत असताना दुसरीकडे स्वतःच्या खाजगी लॅबमधून रक्त, लघवी आणि थुंकी तपासणीचा गोरखधंदा सुरू करण्यात आला. सिव्हिलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब आणि लाचार रुग्णांना विविध तपासण्यांच्या जाळ्यात ओढून त्यांची उघड्या डोळ्यांनी आर्थिक लूट सुरू आहे.
सध्याच्या प्रशासनाचे अभय? नागरिक आक्रमक!
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची आणि खाजगी लॅबच्या गोरखधंद्याची कल्पना सध्याच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाईऐवजी या कर्मचाऱ्याला छुपे पाठबळ दिले जात असल्याचे समजते. शासकीय सेवेचा आणि पदाचा गैरवापर करून रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या या लॅब सहाय्यकाला तातडीने निलंबित करून त्याची कडक विभागीय चौकशी (Departmental Enquiry) करण्यात यावी, अशी संतप्त मागणी आता रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
मालिकेचा पुढील भाग उद्याच्या अंकात... (क्रमशः)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.