🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरक्षणावर केंद्रीय मंत्र्याचं सर्वात मोठं विधान! "जोपर्यंत... तोपर्यंत आरक्षण सोडणार नाही"

आरक्षणावर केंद्रीय मंत्र्याचं सर्वात मोठं विधान! "जोपर्यंत... तोपर्यंत आरक्षण सोडणार नाही"


देशभरातील विविध राज्यांत आरक्षणाचा मुद्द्यावरुन तीव्र संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रातही आरक्षणावरुन मराठा-ओबीसी-धनगर समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं यांनी आरक्षणासाठी जो तो समाज व नेते रस्त्यावर उतरले आहेत.  अशातच केंद्रातील मोदी सरकारच्या तीनही टर्ममध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यानं आजपर्यंतचं सर्वात धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. 
केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष रामदास आठवले यांनी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये धक्कादायक विधान केलं आहे.त्यांनी एकीकडे आरक्षण मिळवण्यासाठी मराठासह इतरही समाज आक्रमक झाले असताना आठवले यांनी आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याचं सांगत राजकीय वर्तुळात नवा बॉम्ब टाकला आहे.
रामदास आठवले म्हणाले, आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहोत. ती पूर्ण झाल्यास आपण आरक्षण सोडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी भारतीय समाजात जातीय आधारावर आरक्षणाची तरतूद असून जर हा जातिवाद संपला,तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.

याचदरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोपर्यंत जातिवाद संपणार नाही, तोपर्यंत आरक्षण लागू राहणार असल्याचंही ठणकावलं आहे. दिल्लीमध्ये आरक्षण हटाओ अंतर्गत मोठं आंदोलन झाल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. आठवले हे मोदी सरकारमधील एक प्रमुख दलित चेहरा असल्यानं त्यांनी आरक्षणाविषयी घेतलली भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गेल्या आठवड्यात झारखंडची राजधानी रांची येथेही आरक्षणाबाबत आजच्यासारखीच रोखठोक भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी जर जातिव्यवस्था समूळ नष्ट झाली, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.

एकीकडे सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'आरक्षण हटाओ आंदोलन' या नावानं मोहीम जोरदारपणे सुरू असतानाच मंत्री रामदास आठवले यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. कारण दिल्लीतील जंतर-मंतरवर जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात आंदोलन झालं होतं. यावेळी पोलिसांनी 50 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गरीब विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.