शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. या मुद्द्यावरुन बोलताना भाजपा आमदाराने रोहित पवार काँग्रेसच्या वाट्यावर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
हा दावा करताना रोहित पवारांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघाला भेट दिल्याचा संदर्भही दिला आहे. परिणय फुकेंच्या या दाव्यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांची आत्या आणि खासदार सुप्रिया सुळेही यावर व्यक्त झाल्यात. नेमकं कोण काय म्हणालंय हे पाहूयात...
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना काय म्हणाले?
"मागच्या अधिवेशनात मी धान उत्पादक शेतकऱ्याच मुद्दा मांडला. आमच्या जिल्ह्यातील आमदाराची एक समिती नेमली म्हणून मी देखील छत्तीसगड येथे अभ्यास दौरा केला. दर्जेदार भाव देऊन धान खरेदी करावी अशी मागणी आमच्या समितीने केली आहे. पुढील अधिवेशनापर्यंत जीआर काढण्याचा आश्वासन भुजबळ साहेबांनी दिले आहे. शेतकऱ्यांना बोनस मिळावा ही आमच्या शेतकऱ्याची मागणी. शंभर टक्के सरकार बोनस जाहीर करणार," असं परिणय फुकेंनी म्हटलं आहे.
रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल काय म्हणाले?
"कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात देशात राहुल गांधी आणि राज्यात रोहित पवार यांनी धास्ती बसली आहे. आपले उरले सूरले आमदार खासदार निवडून येतील की नाही? त्यांच्याऐवजी कॉक्रोच निवडून येतील म्हणून त्यांचं कॉम्पेटिशन आता दीपकेसोबत आहे. रोहित पवार यांनी नाना पटोले यांना खुश करण्यासाठी भंडारा गोंदिया जिल्हा दौरा केला आहे. राष्ट्रवादीत त्यांचं सुप्रिया ताईंसोबत जमून राहील नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते रोहित पवार विरोधात आहेत. त्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचं दिसतंय. म्हणून नाना पटोले यांना खुश करण्यासाठी त्यांनी भंडारा गोंदिया जिल्हा दौरा केला," असा दावा परिणय फुकेंनी केला आहे.
रोहित पवार या दाव्यावर काय म्हणाले?
"परिणय फुके यांना सांगायचे आहे की, माझ्याबद्दलची काळजी करू नका. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार आहात, हे लोकांना माहीत आहे. ही जवळीक कशासाठी वापरता? विरोधकांच्या कार्यकर्त्यांना खोट्या कारवाईत अडकवण्यासाठी ही जवळीक वापरली जाते का?" असा सवाल रोहित पवारांनी यांनी केला आहे. "भाजपचे पदाधिकारी आहेत, वाळूचा धंदा नियमाने चालावा यासाठी तुमच्या पत्नीचा वापर केला जातो. धानाचा बोनस कसा द्यायचा, यासाठी छत्तीसगडला गेले होते. तिथे जाऊन फक्त फिरून आले नाहीत, तर तिथे 35 रुपये दराने सरकार धान खरेदी करत आहे. महाराष्ट्रात 2300 रुपयांनी धान खरेदी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, बोनस दिला जाईल. मात्र, दोन वर्षे झाली तरी बोनस दिलेला नाही. उगाच हवेत गोळीबार करण्यापेक्षा परिणय फुके यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे. आज शेतकरी अडचणीत असेल, तर तुम्ही बोनस द्यायला हवा. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे अप्रत्यक्ष पालकमंत्री असल्यासारखे परिणय फुके वागत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास असल्याचे दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे महत्त्वाचे आहे," असं रोहित पवार म्हणालेत.एवढ्यावरच न थांबताना, "त्यांना आता लोकसभा लढायची आहे. देवरी तालुक्यात सभापती आहेत. कागदावर रोजगार हमी योजनेचे हजारो कोटी रुपये काढले आहेत. चार गावांमध्ये ऑडिट झाल्यानंतर 12 कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. चोरी झाल्याचे आढळले आहे. हे कोण सभापती आहेत? भाजपचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील सभापती यांनी स्वतःच्या दुकानातून लोखंड, सिमेंट यासंदर्भातील पुरावेही आहेत. या संदर्भात सुनावणी आहे. तेही त्या ठिकाणी जाणार आहेत. अशा ठिकाणी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठबळ देता. दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये विहिरींना पैसे मिळत नाहीत, गोठ्यांना पैसे मिळत नाहीत. व्यक्तिगत विषयांवर बोलण्यापेक्षा सरकार तुमचे आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असेल, तर त्यावर बोलणे महत्त्वाचे आहे," असंही रोहित पवारांनी परिणय फुकेंना सुनावताना रोहित पवार म्हणालेत.
सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा परिणय फुकेंनी केल्याचा उल्लेख करत खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खोचक प्रतिक्रिया नोंदवताना, "चांगली कल्पना आहे त्यांनी टीव्ही सिरीयल मध्ये काम करायला पाहिजे नाही तर मग नेटफ्लिक्स सिरीजसाठी लिहावं," असा सल्ला दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.