ड्रायव्हिंग लायसन्स हे केवळ वाहन चालवण्यासाठीचा परवाना नसून देशभरात एक महत्त्वाचा ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही वापरले जाते. मात्र, जर तुमच्या लायसन्सवर जुना किंवा चुकीचा पत्ता असेल, तर भविष्यात ई-चालान, आरसी ट्रान्सफर, लायसन्स नूतनीकरण किंवा इतर कायदेशीर कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
आता डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 'परिवहन सारथी' पोर्टलवरून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत आधार-आधारित e-KYC चा वापर करून आरटीओ कार्यालयात न जाता ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलता येतो.
आवश्यक कागदपत्रांची यादी
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (Scan Copies) तयार ठेवाव्यात.
मूळ ड्रायव्हिंग लायसन्स
नवीन पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, रेशन कार्ड, भाडे करार किंवा ३ महिन्यांपेक्षा जुने नसलेले वीज/पाणी/टेलिफोन बिल.
ओळखपत्र: पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा आधार कार्ड.
इतर: पासपोर्ट साईज फोटो, पांढऱ्या कागदावर केलेली डिजिटल स्वाक्षरी आणि स्वयं-घोषणा वैद्यकीय फॉर्म-१ (Self-Declaration Medical Form 1).
घरबसल्या पत्ता बदलण्याची प्रक्रिया
१. वेबसाइटला भेट द्या: परिवहन विभागाच्या अधिकृत sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जा आणि तुमचे राज्य निवडा.२. सर्व्हिस निवडा: होमपेजवर 'Apply for Change of Address' किंवा 'Services on Drivers License' या पर्यायावर क्लिक करा.३. माहिती प्रविष्ट करा: तुमचा DL नंबर आणि जन्मतारीख टाकून 'Get DL Details' वर क्लिक करा व तुमची प्रोफाइल कन्फर्म करा.४. e-KYC चा वापर करा: तुमचा नवीन RTO निवडा आणि थेट RTO कार्यालयात जाणे टाळण्यासाठी 'आधार आधारित e-KYC' हा पर्याय निवडा.५. सेवा सेलेक्ट करा: दिलेल्या सेवांच्या यादीतून 'Change of Address in DL' च्या चेक बॉक्सवर टिक करा.६. नवीन पत्ता भरा: फॉर्ममध्ये तुमचा नवीन आणि कायमचा पत्ता अचूक प्रविष्ट करा.७. कागदपत्रे अपलोड करा: नवीन पत्त्याचा पुरावा, फॉर्म-१, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.८. शुल्क भरा: निर्धारित सरकारी फी ऑनलाइन भरून पावती (Acknowledgement Slip) डाउनलोड करून ठेवा.दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर NOC आणि नवीन RTO ची प्रक्रियादुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर NOC आणि नवीन RTO ची प्रक्रियाजर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाला असाल, तर तुम्हाला पहिल्या आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) घ्यावे लागते:-जुन्या RTO कडून NOC मिळवणे:-परिवहन सारथी पोर्टलवर तुमचे जुने राज्य निवडा.-DL Service मध्ये जाऊन DL नंबर व जन्मतारीख प्रविष्ट करा.-Issue of NOC पर्याय निवडून नवीन राज्य, नवीन RTO आणि NOC चे कारण निवडा.-जुन्या लायसन्सची कॉपी अपलोड करून सरकारी फी भरा.-पडताळणीनंतर जुना RTO ऑनलाइन NOC जारी करेल.२. नवीन राज्यातील RTO मध्ये अर्ज करणे-पोर्टलवर तुमचे नवीन राज्य निवडा.-'Apply for Change of Address' वर क्लिक करून DL नंबर व जन्मतारीख भरा.-जुन्या RTO कडून मिळालेला NOC नंबर आणि तो जारी झाल्याची तारीख नोंदवा.-नवीन पत्ता प्रविष्ट करून पत्त्याचा पुरावा आणि मिळालेली NOC ऑनलाइन अपलोड करा.-पत्ता बदलण्याचे शुल्क भरा. अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स थेट स्पीड पोस्टद्वारे-तुमच्या नवीन पत्त्यावर पाठवले जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.