🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोट्यवधींची काळी कमाई जप्त! नोटांचा पाऊस अन् सोन्याचा साठा पाहून पोलीसही हादरले; ड्रग्ज लेडी 'पार्वती' गजाआड!

कोट्यवधींची काळी कमाई जप्त! नोटांचा पाऊस अन् सोन्याचा साठा पाहून पोलीसही हादरले; ड्रग्ज लेडी 'पार्वती' गजाआड!


नवी दिल्ली:  देशाच्या राजधानी दिल्लीत पोलिसांनी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिल्ली ते राजस्थानपर्यंत पसरलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मागील आठवड्यात एका महिलेसह २ आरोपींना ताब्यात घेतले होते. एक ४२ वर्षीय ड्रग्स लेडी पार्वती बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेली आहे. तिच्यावर एनडीपीएस कायदा आणि उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत आधीच १२ गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नरेला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये ' बॅड कॅरेक्टर हिस्ट्रीशीट'मध्ये तिचे नाव आहे.

बॉडीगार्डसह भाड्याच्या खोलीत राहते पार्वती

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलीस पथकाने न्यू सनोथ कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला. त्यावेळी पार्वती आणि तिच्यासोबत राहणारा विकास कुमार उर्फ ​​शानू या दोघांना अटक करण्यात आली. पार्वती ड्रग्समधून कमावलेल्या पैशातून घरही बांधत होती. तिची टाटा हॅरियर गाडीही जप्त करण्यात आली आहे. पार्वती भाड्याच्या घरात राहत होती. तिचा कायमचा पत्ता जे.जे. कॉलनी, बावाना हा आहे असं पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी पार्वतीच्या घरातून ५६.६९ लाखांची रोकड, ३५५ ग्रॅम सोने, १६१ ग्रॅम चांदी आणि ४ मालमत्तेचे कागदपत्र जप्त केलेत. हा सर्व पैसा ड्रग्सच्या काळ्या कमाईतून कमावला होता. पोलिसांनी १.२०४ किलो हेरोईन, ६४.६२ लाख रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि २ कारही कारवाईत जप्त केल्यात. पार्वतीजवळ दीड कोटी रूपयांहून अधिक किंमतीचे ड्रग्स सापडले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.