🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘सांगली दर्पण’च्या दणक्याने ‘त्या’ बहुचर्चित लॅब असिस्टंटची मूळ पदस्थापनेवर हकालपट्टी; आता जिल्हाबाहेर उचलबांगडीसाठी जोरदार चर्चा!​

‘सांगली दर्पण’च्या दणक्याने ‘त्या’ बहुचर्चित लॅब असिस्टंटची मूळ पदस्थापनेवर हकालपट्टी; आता जिल्हाबाहेर उचलबांगडीसाठी जोरदार चर्चा!


सांगली :- सिव्हिल हॉस्पिटलमधील संशयास्पद कारभार आणि विशिष्ट कर्मचाऱ्यांचे चाललेले 'लाड' उघडकीस आणल्यानंतर अखेर सिव्हिल प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. 'सांगली दर्पण'च्या सडेतोड आणि धडक वृत्तमालिकेचा दणका बसताच, त्या बहुचर्चित  लॅब असिस्टंटला प्रशासनाने तातडीने मूळ पदस्थापनेवर हजर होण्याचे फर्मान सोडले. आदेश निघताच आज अखेर तो कर्मचारी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हजर झाला आहे.

​सिव्हिलमध्ये कर्मचाऱ्यांचा सुटकेचा निश्वास, पण 'आर्थिक लुटीचीची पुन्हा भीती!

एवढ्या 'कर्तृत्ववान' कर्मचाऱ्याची मूळ ठिकाणी रवानगी होताच आज दिवसभर सिव्हिल हॉस्पिटलच्या वर्तुळात त्याचीच खरपूस चर्चा रंगली होती. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या इतर कर्मचारी व रुणाचें नातेवाईक  "हुश्श... सुटलो एकदाचे!" असा सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, हा आनंद किती टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण यापूर्वीही त्याची मिरज येथे बदली करण्यात आली होती; परंतु त्यामागे आर्थिक व्यवहारांचा मोठा घोळ असल्याने तो पुन्हा सांगली सिव्हिलमध्ये परतला होता. त्यामुळे "मि पुन्हा येईन मी पुन्हा ," अशीही खुसपूस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

​"आता कोणाचेही लाड पुरवले जाणार नाहीत" - अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव
या संपूर्ण प्रकरणावर अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी 'सांगली दर्पण'शी बोलताना स्पष्ट केले की, "बातमीची तात्काळ दखल घेऊन त्या कर्मचाऱ्याची त्याच्या मूळ पदस्थापनेवर रवानगी करण्यात आली आहे. इथून पुढे रुग्णालयात अशा कोणत्याही कर्मचाऱ्याचे लाड पुरवले जाणार नाहीत आणि शिस्तीचा भंग खपवून घेतला जाणार नाही."
​'सांगली दर्पण'च्या ५ भागांच्या मालिकेला तब्बल ५.८९ लाख वाचकांची पसंती!

सिव्हिल हॉस्पिटलमधील गैरप्रकारांवर प्रकाश टाकणारी 'सांगली दर्पण'ची ५ भागांची बातमी मालिका वाचकांनी डोक्यावर घेतली. तब्बल ५ लाख ८९ हजार ४०० वाचकांनी या बातम्या वाचून प्रचंड प्रतिसाद दिला. वाचकांचा वाढता पाठिंबा हाच 'सांगली दर्पण'च्या निर्भीड पत्रकारितेचा खरा पाठींबा ठरला आहे. ​इतर 'कायमस्वरूपी' अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलखोल होणार; 'सांगली दर्पण'चे गुप्त माहिती देण्याचे आवाहन!
गेल्या १० ते १२ वर्षांपासून शासकीय नियमांचा भंग करून बदलीच्या कायदयाला हरतालाळ फासून एकाच छताखाली ठाण मांडून बसलेल्या आणि गैरप्रकार करणाऱ्या इतरही कर्मचाऱ्यांची पोलखोल 'सांगली दर्पण' येत्या दिवसांत टप्प्याटप्प्याने करणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील अन्यायाविरोधात हा प्रकाशझोत असाच सुरू राहील.
​जर कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होत असेल किंवा हॉस्पिटलमधील गैरकारभाराबाबत काही गोपनीय माहिती असल्यास ती 'सांगली दर्पण'कडे पाठवावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन ‘सांगली दर्पण’च्या वतीने करण्यात येत आहे.

​पुढील टप्पा: जिल्हाबाहेर बदली कधी?
मूळ ठिकाणी रवानगी झाल्यानंतर आता 'त्या' लॅब असिस्टंटची थेट जिल्हाबाहेर उचलबांगडी कधी होणार? या चर्चेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगलाच जोर पकडला आहे. प्रशासनाचा सध्याचा आक्रमक पवित्रा पाहता, त्याची जिल्हाबाहेर हकालपट्टी होण्यात आता तिळमात्र शंका उरलेली नाही!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.