🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वयाचे अंतर फक्त आकडा? ७२ वर्षांचा 'हा' दिग्गज खेळाडू अडकला ५२ वर्षे लहान तरुणीच्या प्रेमात; थाटामाटात झाला विवाह!

वयाचे अंतर फक्त आकडा? ७२ वर्षांचा 'हा' दिग्गज खेळाडू अडकला ५२ वर्षे लहान तरुणीच्या प्रेमात; थाटामाटात झाला विवाह!

मलेशियाचे दिग्गज माजी फुटबॉलपटू आणि 'हरिमऊ मलाया'चे माजी स्टार दातुक अब्दह अलिफ यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.

सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. २७ ऑगस्ट रोजी एका अत्यंत खाजगी सोहळ्यात त्यांनी अवघ्या २० वर्षे वयाच्या तरुणीसोबत निकाह केला असून, दोघांमधील ५२ वर्षांच्या वयाच्या अंतरामुळे इंटरनेटवर ही बातमी प्रचंड चर्चेत आली आहे.

धाकट्या भावाने दिली लग्नाची माहिती; दोन्ही कुटुंबांचे लाभले आशीर्वाद!

या विवाहाची अधिकृत पुष्टी स्वतः अब्दह यांचे धाकटे बंधू आणि माजी खेळाडू तथा प्रशिक्षक दातुक युनूस अलिफ यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना युनूस म्हणाले, “अल्हम्दुलिल्लाह, माझ्या भावाने २७ ऑगस्ट रोजी विवाह केला आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आणि पूर्ण आशीर्वादाने हा निकाह पार पडला. ते दोघे नेहमी सुखात राहावेत अशीच आमची प्रार्थना आहे.” सध्या अब्दह अलिफ आपल्या पत्नीसोबत हनीमूनवर असल्यामुळे त्यांचा फोन लागत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मलेशियाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार; ऑलिम्पिक स्वप्न राहिले होते अधुरे –

दातुक अब्दह अलिफ हे मलेशियन फुटबॉल इतिहासातील अत्यंत मानाचे व्यक्तिमत्त्व आहेत. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकात त्यांनी देशासाठी चमकदार कामगिरी केली होती. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ऐतिहासिक मलेशियन संघाचे ते अविभाज्य भाग होते, ज्या संघाने दक्षिण कोरियाला २-१ ने पराभूत केले होते. त्या सुवर्णकाळात त्यांनी दातुक सोह चिन आउन आणि दातुक संतोख सिंग या दिग्गजांसोबत मैदान गाजवले होते.


बहिष्कारामुळे भंगले होते स्वप्न; आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत –

सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मलेशियाने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार घातल्यामुळे अब्दह यांचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले होते. व्यावसायिक फुटबॉल आणि प्रसिद्धीच्या झोतातून अनेक वर्षे लांब राहिल्यानंतर, आता वयाच्या ७२ व्या वर्षी २० वर्षांच्या जोडीदाराशी लग्नगाठ बांधल्यामुळे हा दिग्गज पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.