🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरोग्य सल्ला की गुन्हा? खोकताना तोंडावर हात ठेवायला सांगितल्याने थेट डॉक्टरचंच डोकं फोडलं; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ!

आरोग्य सल्ला की गुन्हा? खोकताना तोंडावर हात ठेवायला सांगितल्याने थेट डॉक्टरचंच डोकं फोडलं; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ!


छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरातील एका चहाच्या हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांनी शेजारी खोकणाऱ्या व्यक्तीला ‘खोकताना तोंडाला हात लावा’ असा सल्ला दिला. या क्षुल्लक गोष्टीचा राग आल्याने संशयित आरोपीने थेट काउंटरवरील चहाचा काचेचा ग्लास उचलून डॉक्टरच्या डोक्यावर, कपाळावर वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी १३ सप्टेंबरला सिडको पोलिस ठाण्यात चिव्या नावाच्या टवाळखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील भोकरदनचे रहिवासी २८ वर्षीय डॉ. सुमित सुभाष सावंत शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कॅनॉट परिसरातील 'गावठी चहा' टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. तेथे चहा घेत असताना बाजूला उभ्या असलेल्या 'चिव्या' नावाच्या तरुण जोरात खोकलत होता. सतत व मोठ्याने खोकलत तो तोंडाला हात न लावता थेट डॉक्टरच्या तोंडावर खोकलला. त्यावर डॉ. सावंत यांनी अरे दादा, तू खोकू नकोस, निदान खोकताना तोंडाला हात तरी लाव, असे सांगितले.

संशयित आरोपी 'चिव्या' याला डॉक्टरच्या या सल्ल्याचा राग आला. त्याने थेट काउंटरवर ठेवलेला चहाचा काचेचा ग्लास उचलून त्यांच्या कपाळावर जोरात फेकून मारला. काचेचा ग्लास लागल्याने दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. रक्तबंबाळ डॉक्टरांनी तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल घडल्या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळून गेला. घटनेनंतर डॉ. सावंत यांनी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.