🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"फोटो हटवला तर गुन्हा दाखल झाला, पण अजित पवार अपघात प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही"- सुप्रिया सुळे

"फोटो हटवला तर गुन्हा दाखल झाला, पण अजित पवार अपघात प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही"- सुप्रिया सुळे


मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांनी काढायला लावला. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्मित विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रश्न विचारताच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी चालू असून याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. याच बाबीचा उल्लेख करून सुप्रिया सुळे यांनी खदखद व्यक्त केली.

अजित पवार यांच्या मृत्युप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे निधन आणि त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर भाष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढून टाकले म्हणून दोन तासांत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. पण, दुसरीकडे सत्तेत असणारा उपमुख्यमंत्री, माझा भाऊ अजित पवार यांच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.”

“अजित पवार गेल्यानंतरही त्यांच्या पक्षाचे लोक सत्ता भोगत आहेत. याप्रकरणाचा तपास नेमका कुठे सुरू आहे, त्याची स्थिती काय आहे, हेच आम्हाला माहिती नाही. अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत त्यापैकी एकही आमदार बोलत नाही, अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही,” अशी खदखद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
फोटो हटवताच तीन जणांना अटकही

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारी आणि हर्षद गोडसे अशी आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक अटक करण्यात आली आहे. मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.