🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात बुलेट ट्रेन धावणार; मुंबई-पुणे अंतर ४८ मिनिटांत पार होणार: एकनाथ शिंदे

पुण्यात बुलेट ट्रेन धावणार; मुंबई-पुणे अंतर ४८ मिनिटांत पार होणार: एकनाथ शिंदे


मुंबई पुणे बुलेट ट्रेन : मुंबई ते पुणे 4 तासांचा प्रवास फक्त 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबई पुणे हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते थेट सावंतवाडी रोड दरम्यान बहुप्रतिक्षित नवीन नियमित एक्स्प्रेस ट्रेनचा आज शानदार शुभारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई पुणे बुलेट ट्रेनची घोषणा केली.

मुंबई सावंतवाडी ट्रेन सुरू झालीय. सर्वांना याचा फायदा होईल. मुंबई ते पुणे ही 48 मिनिटांत पोहचणारी बुलेट ट्रेन सुरू होणार आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. 18 हजार कोटी रेल्वे मुंबईत खर्च करत असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. 2027 मध्ये सुरत आणि गुजरातमधील बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेनची पहिला टप्पा सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभाग जोडले जातील. भविष्यात हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि बंगळूरुपर्यंत हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात नवीन बुलेटट्रेन कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे.
बुलेट ट्रेनचे 7 नवीन कॉरिडॉर

मुंबई-पुणे
बंगळूर-चेन्नई
बंगळूर-हैदराबाद
पुणे-हैदराबाद
दिल्ली-लखनौ
दिल्ली-वाराणसी
दिल्ली-सिलिगुडी

मुंबई पुणे सर्वात लक्षेवधी मार्ग
7 मार्गांपैकी मुंबई पुणे हा सर्वात लक्षवेधी मार्ग आहे. या नव्या हायस्पीड रेल्वेमुळे मुंबई पुणे प्रवास फक्त 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या, हे अंतर रस्ते आणि रेल्वेमार्गे पार करायला अनेक तास लागतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, दैनंदिन प्रवासी, उद्योग आणि व्यावसायिक उपक्रमांना याचा मोठा फायदा होईल. हा प्रकल्प देशातील सर्वात महत्त्वाच्या हाय-स्पीड प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.