🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"७० हजार भाडं अन् खिडकीतून दिसणारी चाळ!" मुंबईच्या भाड्यावरून संतापलेली अभिनेत्री म्हणाली, "शारीरिक संबंधांना नकार दिला की..."

"७० हजार भाडं अन् खिडकीतून दिसणारी चाळ!" मुंबईच्या भाड्यावरून संतापलेली अभिनेत्री म्हणाली, "शारीरिक संबंधांना नकार दिला की..."


'एमटीव्ही रोडीज ८'ची विजेती, 'सपने सुहाने लडकपन के' आणि 'सीआयडी' फेम अभिनेत्री आंचल खुरानाने तिच्या मुंबईतील घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सहसा सोशल मीडियावर कलाकारांची आलिशान घरं पाहायला मिळतात, पण आंचलचा हा व्हिडीओ त्याच्या अगदी उलट आहे. आंचल मुंबईत 1 BHK फ्लॅटमध्ये राहते. त्याचं एका महिन्याचं भाडं ७० हजार रुपये आहे. तिच्या घरातून बाहेर पाहिल्यावर कोणतीही हिरवळ किंवा समुद्र दिसत नाही. तर, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली एक मोठी चाळ दिसते. मनोरंजन विश्वात १४ वर्षांहून अधिक काळ काम करूनही मुंबईत स्वतःचं घर घेणं हे अजूनही फक्त एक स्वप्न असल्याचं आंचल सांगते.

हे भाड्याचं घर आहे. वाढती महागाई आणि इंडस्ट्रीतील परिस्थिती पाहता घर घ्यायला अजून ४००-५०० वर्षे लागतील, असं तिने सांगितलं. "या घराचं भाडं ७० हजार रुपये आहे आणि हे घर अजिबात अॅस्थेटिक नाहीये," असं आंचल म्हणाली. "हे आमचं छोटसं किचन आहे, जागा कमी व सामान जास्त असल्याने मला वॉशिंग मशीनही इथेच ठेवावी लागतेय."

आंचलच्या घरातून दिसते चाळ

आंचलच्या घराच्या खिडकीतून उंच इमारती किंवा समुद्र वगैरे दिसत नाही तर मोठी चाळ दिसते. "आपण काय करू शकतो, या बजेटमध्ये इतकंच मिळतं," असं आंचल खुराना म्हणाली. आंचलकडे महागड्या व लक्झरी हँडबॅग आहेत, त्याही तिने दाखवल्या.

आंचलने नंतर तिचं बेडरूम दाखवलं. एक छोटी खोली, तिथेच तिचं कपाट आहे. त्यात तिच्या बॅग्ज व कपडे ठेवलेले आहेत. तिथेच एक छोटं देवघर आहे. त्याचबरोबर तिने पाहुण्यासाठी एक बेड ठेवलाय, कोणी नसताना तिथेच कपडे सुकवत असल्याचं आंचलने सांगितलं. आंचलचे घर १३ व्या मजल्यावर आहे.

आंचल खुराना सध्या कलर्सच्या तू ज्युलिएट जट्ट दी मालिकेत काम करतेय. आंचल आता ३६ वर्षांची आहे. जवळपास १५ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असलेल्या आंचलला २६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता.

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तरी कामावरून काढतात - आंचल खुराना

इंडस्ट्रीबद्दल बोलताना आंचल म्हणाली, "इथे एका लहानशा कारणावरूनही कलाकाराला मालिकेतून किंवा कामावरून काढून टाकलं जातं. तुम्ही कोणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तरी तुम्हाला रिप्लेस केलं जातं. स्वतःच्या स्वाभिमानासाठी भांडलात, तरी तुम्हाला कामावरून काढतात किंवा तुमचे शूटिंगचे दिवस कमी करतात. आम्ही रोज सकाळी एका नव्या आशेने उठतो, ऑडिशन देतो आणि दररोज संध्याकाळी रिजेक्शन व इतरांशी तुलना करत झोपायला जातो. माझी ऑडिशन उत्तम होऊनही मला अनेकदा रिजेक्ट करण्यात आलं आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.