🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरबा नाईट्सचा भन्नाट ट्रेंड: नवरात्रीत तालावर थिरकायला मिळतोय 'भाड्याने गरबा पार्टनर'; १ ते २ हजारात पॅकेजेस हाऊसफुल!

गरबा नाईट्सचा भन्नाट ट्रेंड: नवरात्रीत तालावर थिरकायला मिळतोय 'भाड्याने गरबा पार्टनर'; १ ते २ हजारात पॅकेजेस हाऊसफुल!


महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा सण अतिशय श्रद्धेने, सांस्कृतिक वैविध्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात नवरात्रीच्या काळात अनेक खास परंपरा पाळल्या जातात. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत जपल्या जाणाऱ्या या संस्कृती परंपरा कुठेतरी लोप पावत चालल्या आहेत. महाराष्ट्रात मुख्य साडेतीन शक्तीपीठांना महत्त्व आहे. परंतू सध्या डीजेच्या तालावर गरबा आणि दांडिया मात्र प्रसिद्धीच्या उंचीवर आहे. अशातच आता काही पोस्टर्समुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

गोंधळाची जागा गरब्यानं घेतली

महाराष्ट्रातील नवरात्री म्हणजे कुलदेवीच्या आराधना आणि 'गोंधळ' ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आयोजित केला जातो. मात्र आता त्याची जागा गुजराती संस्कृतीचा भाग असलेल्या गरब्याने घेतली आहे. अशातच महाराष्ट्रातील अनेक पुण्या मुंबईसारख्या शहरी भागात गरब्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टर्समुळे हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक भन्नाच ऑफर व्हायरल होतीये.

गरबा पार्टनर भाड्याने मिळणारी ऑफर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टर्समध्ये 'दांडिया नाईट्स'ला एकटं जाणं टाळण्यासाठी 'गरबा पार्टनर भाड्याने' देण्याची ऑफर दिली जात आहे. मुले आणि मुलींसाठीचे पॅकेजेस 1000 ते 2000 पर्यंत आहेत. या कथित व्यावसायिक कल्पनेमुळे हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. या नवरात्रीत एकटे नाचू नका, असं म्हणत पोस्टर व्हायरल झाले आहेत. हा ट्रेंड फक्त मुलांपुरता मर्यादित नाही. मुलींच्या फोटोंसहित अशाच प्रकारचे दरपत्रकांचे पोस्टर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. यामध्ये जोडीदार भाड्याने घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या पॅकेजेसची यादी दिली गेलीये.
गोल्ड अन् सिल्व्हर पॅकेज

सिल्व्हर पॅकेजमध्ये 1000 रुपये द्यावे लागतात. यामध्ये 2 तासांचा गरबा डान्स, मॅचिंग कपडे, गरब्याच्या मूलभूत स्टेप्स शिकवणं आणि एक क्यूट सेल्फी यांचा समावेश आहे. तर गोल्ड पॅकेजमध्ये 1500 रुपयात यामध्ये चार तासांच्या गरब्याचा समावेश आहे. इतरांना दाखवण्यासाठी एका बनावट भेटीची कहाणी तयार केली जाईल. मॅचिंग कपडे, इन्स्टाग्रामसाठी फोटो रील्स आणि मित्रांना 'भाऊ आणि वहिनी' म्हणण्याची सोय यांचाही समावेश असेल.

कपाळावरचं किस किंवा हातात हात
दरम्यान, तिसरं पॅकेज सर्वात खरतनाक असेल. 2000 रुपयांचं प्लॅटिनम पॅकेज असलेला प्लॅन, यामध्ये रात्रभर चालणारा गरबा, अप्रतिम नृत्य प्रकार, कपाळावरचे किस किंवा गर्दीत हात धरणं यांचा समावेश आहे. इतकंच नाही, तर गरब्यानंतर ओढणी सांभाळण्यापासून ते घरी किंवा पार्टीमध्ये सुरक्षितपणे सोडण्यापर्यंत सर्व गोष्टींचे आश्वासन दिलं जातं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.