🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात उपसा बंदीचे आदेश जतसह पाच तालुक्यांतील तलावांचा समावेशपिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहणार

सांगली जिल्ह्यात उपसा बंदीचे आदेश जतसह पाच तालुक्यांतील तलावांचा समावेश पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहणार


सांगली : धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11, 49 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार, पुढीलप्रमाणे प्रकल्प व नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या तसेच बिगर सिंचनासाठी (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. उपसा बंदीचा कालावधी दि. 20 सप्टेंबर 2026 पासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील, असे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिदीपत्रकाव्दारे कळविले आहे.


उपसा बंदीच्या क्षेत्रामध्ये कृष्णा नदी मौजे अटके ता. कराड जि. सातारा ते को. पं. बंधारा डिग्रज ता. मिरज जि. सांगली उजवा तीर. को.प. बंधारा डिग्रज ते को. प. बंधारा राजापूर (महाराष्ट्र राज्य हद्दी पर्यंत) कृष्णा नदीचे सांगली पाटबंधारे विभाग, सांगलीकडे येणारे क्षेत्र, सांगली पाटबंधारे विभागाकडील दिनांक 3 सप्टेंबर 2026 च्या आदेशान्वये लागू केलेले जत तालुक्यातील सर्व तलाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळा तालुक्यातील सांगली टपाटबंधारे विभागांतर्गत असलेले सर्व तलाव, मोरणा नदी  व त्यावरील को. प. बंधाऱ्यांचे दोन्ही तीर यांचा समावेश आहे.
 
कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळ्यातील 17 तलावांवर बंदी
सांगली पाटबंधारे विभागांतर्गत कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळा तालुक्यातील एकूण 17 तलावांवर उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी (मध्यम प्रकल्प) तसेच बंडगरवाडी, बोरगाव, दुधेभावी, घोरपडी, हरोली, कुची, लांडगेवाडी, लंगरपेठ, नांगोळे, रायवाडी  हे  10 लघु प्रकल्प, मिरज तालुक्यातील भोसे (मिरज) लघु प्रकल्प, शिराळा तालुक्यातील मोरणा शिराळा हा मध्यम प्रकल्प  तसेच अंत्री, शिवणी, टाकवे व वाकुर्डे हे चार लघु प्रकल्प, तर वाळवा तालुक्यातील कार्वे व रेठरे धरण या दोन लघु प्रकल्पांचा समावेश आहे.
जत तालुक्यातील 26 तलावांचाही समावेश

जत तालुक्यातील उपसा बंदीमध्ये कोसारी, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, सिद्धनाथ, रेवणाळ, बिरनाळ, शेगाव, तिकोंडी नं. 1, जालिहाळ, येळवी, सोरडी, प्रतापपूर, सनमडी, भिवर्गी, शेगांव क्र. 2, दरिबडची, पांडोझरी, अंकलगी, मिरवाड, गुगवाड, डफळापूर, बिळूर (केसराळ), उमराणी, खोजनवाडी, बेळुंखी आणि दोड्डानाला या 26 तलावांचा समावेश आहे.
उपरोक्त कालावधीत पिण्याच्या पाणीपुरवठ्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी (खाजगी) सांगली पाटबंधारे विभाग, सांगली यांच्या कार्यक्षेत्रात येणारी कृष्णा व मोरणा नदी तसेच मध्यम व लघु प्रकल्पांमधून पाणी उपसा केल्यास तो अनधिकृत उपसा समजून संबधीतांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची सांगली जिल्ह्यातील कृष्णा, मोरणा नद्यांसह मध्यम व लघु प्रकल्पांवरील लाभधारकांनी गांभीर्याने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी / औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाने केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.