🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गाडीला लिंबू-मिरची बांधल्यास होणार ५ हजारांचा दंड? सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजचे वास्तव

गाडीला लिंबू-मिरची बांधल्यास होणार ५ हजारांचा दंड? सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजचे वास्तव


वाहनावर लिंबू आणि मिरची लावल्यास आता 5 हजारांचा दंड आकारला जाणार आहे... होय, असा मेसेज व्हायरल होतोय...बरेच जण गाड्यांना लिंबू-मिरच्या लावतात...त्यामुळे या दाव्यात खरंच तथ्य आहे का...? लिंबू मिरची लावल्यास 5 हजारांचा दंड लागणार आहे का...? हा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

काही लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर लिंबू आणि मिरची लटकवतात.आता वाहनावर लिंबू आणि मिरची लावल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. काही लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर लिंबू आणि मिरची लटकवतात. पण आता असे केल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल का? अनेकांना हाच प्रश्न पडलाय...काहींनी तर जर राफेलवर लिंबू आणि मिरची लटकवली जाऊ शकते, तर वाहनांवर का नाही? असाही सवाल केला...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने वाहतूक पोलिसांकडून ही माहिती मिळवली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

वाहनाच्या नंबर प्लेटवर नोंदणी क्रमांक दिसला पाहिजे

वाहनांवर लिंबू मिरची लावणे हा गुन्हा ठरत नाही

लिंबू मिरची लावून नंबर प्लेट हाईड केल्यास कारवाई

नंबर प्लेटवर छेडछाड केल्यास 5 हजारपर्यंत दंड होतो

सप्टेंबर 2021 मध्ये दिल्ली पोलिसांनी नंबर प्लेटवर लिंबू मिरची लावणाऱ्या वाहनांना चलन जारी केले होतं...

पण, या मेसेजमध्ये छेडछाड करून वाहनाला लिंबू मिरची लावल्यास कारवाई होणार असल्याचा दावा केला...मात्र. नंबर प्लेट व्यतिरिक्त वाहनावर इतरत्र कुठेही लिंबू आणि मिरची लावल्यास कोणतेही चलन जारी केले जात नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत वाहनांना लिंबू मिरची लावल्यास 5 हजारांचा दंड आकारला जातो हा दावा असत्य ठरलाय...नंबर प्लेटवर छेडछाड केल्यास कारवाई होते...

सौजन्य :-साम TV 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.