🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नशाखोरांना दणका! मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक मोहीम; ५ संशयित गजाआड

नशाखोरांना दणका! मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक मोहीम; ५ संशयित गजाआड


सांगली :  आगामी गणेशोत्सव २०१६ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने ३१ ऑगस्ट रोजी मिरज शहरात विशेष मोहीम राबवत ५ संशयितांवर भडक कारवाई केली आहे. सार्वजनिक, अंमान्या आणि निर्जन ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या व नशा करणाऱ्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी या मोहिमेचे विशेष नियोजन केले होते. पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग खरात आणि पोलीस अंमलदारांच्या विविध पधकांनी मिरज शहरातील मिशन चौक, एसटी स्टैंड, रेल्वे स्टेशन रस्ता परिसर तसेच संवेदनशील व निर्जन ठिकाणी पायी आणि मोटारसायकलवरून सखोल गस्त घातली.

या कारवाईदरम्यान जानवाडे प्लॉट (माणिकनगर) येथील अयुब इब्राहिम सय्यद (वय ३२) व अलाफ बुब्राहिम सय्यद (वय ३५), रॉकेट डेपो झोपडपट्टीतील संतोष दत्तात्रय झळके (वय २६), नदीवेस बौद्ध वसाहतीतील दीपक संजय तळकेरे (वय २२) आणि कोल्हापुर रोड येथील फिरोजखान बशीर पठाण (वय ३२) या पाच जणांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारच्या 'नशामुक्त भारत अभियान आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाकडून अशी भडक कारवाई पुढेही सातत्याने सुरूच राहणार आहे. नागरिकांनी आपापल्या परिसरात असा कोणताही गैरप्रकार, नशाखोरी किंवा संशयित हालचाली आढळल्यास तातडीने 'डायल १९२' या क्रमांकावर संपर्क साधून पोलीस प्रशारानाला माहिती द्यावी, असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.