🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य: "दहीहंडीत नृत्यांगनांना नाचवणारे देशद्रोही; डीजेवर पूर्ण बंदी आणा!"

संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य: "दहीहंडीत नृत्यांगनांना नाचवणारे देशद्रोही; डीजेवर पूर्ण बंदी आणा!"

राज्यात सध्या गणेशोत्सवादरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पुण्यात पहिल्यांदा विद्यानंद बापट यांनी डिजेबंदीची मागणी केली आणि त्यानंतर हा मुद्दा राज्यभरात ऐरणीवर आला.

आता डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्यांवर अनेकजण वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत, तर काहीजण ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात ठाम भूमिका मांडतत आहेत.

यातच नुकताच दहीहंडी उत्सव राज्यभरात साजरा झाला. मात्र, काही दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये नृत्यांगना अश्लील हावभाव करताना दिसून आल्याचा आरोप केला जात आहे. अनेकांनी त्याबाबत आक्षेप घेत टीका देखील केली आहे. दरम्यान, दहीहंडीच्या उत्सवात नृत्यांगना नाचवल्याच्या घटनेवर आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच डिजेबंदीच्या मुद्द्यांवरही आपली ठाम भूमिका संभाजी भिडे यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली आहे.

डीजेबाबत संभाजी भिडे यांनी काय म्हटलं?

विविध सण-उत्सवांदरम्यान डीजे किंवा डॉल्बी वाजवले जातात. त्यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना संभाजी भिडे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले की, “डीजे आणि डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. त्या डीजे आणि डॉल्बीचा उपयोग काय आहे? त्यामधून देशाला काय मिळतं? डीजे आणि डॉल्बी वाजवणं मला मूर्खपणा वाटतो. सगळ्या काळ्या शक्ती गाडण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजेत, त्यात डीजे आणि डॉल्बी देखील आहे.”

‘दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही’ : संभाजी भिडे

दहीहंडी सणांमध्ये काही ठिकाणी नृत्यांगना नाचवल्या जात आहेत. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “तो अतिशय मुर्खपणा आहे, म्हणजे दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही आहेत. असले प्रकार करणारे देशद्रोही आहेत, मग ते आपले असले तरी ते देशद्रोही आहेत.”

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.