खडा हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती हटवताना महापालिका प्रशासनाला घाम फुटला आहे. तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तसंच क्रेन लावूनही हनुमानाची मूर्ती हटवण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही, त्यामुळे हा कुतुहलाचा विषय बनला आहे.
महापालिकेच्या इतक्या प्रयत्नानंतरही हनुमानाची मूर्ती इंचभरही हलली नसल्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त तेलं जात आहे. तर हिंदुत्ववादी संघटना, युवक काँग्रेस आणि स्थानिक लोकांनी हनुमान चालिसा पठण करून हनुमानाची मूर्ती हटवायला विरोध केला आहे. आता महापालिका अधिकारी मंगळवारी मंदिर हटवण्याचा प्रयत्न पुन्हा करणार आहे.
उज्जैनमध्ये सिहस्थ महाकुंभ 2028 साठी रस्ता रुंदीकरण आणि महाकाल सवारीसाठी कंठाल चौराहा पासून ते छत्री चौकपर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे, पण मध्येच प्राचीन खडा हनुमान मंदिर आहे. हे मंदिर हटवण्यासाठी प्रशासन मागच्या 5 दिवसांपासून प्रयत्न करत आहे, पण गुरूवारपासून हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही.
मूर्तीवर लावला तंबू
महापालिकेकडून मंदिर भवन तोडण्यात आलं आहे, तर हनुमानाच्या मूर्तीला तंबू लावून सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. छोटा सराफा, बडा सराफा, नमक मंडी, गोपाल मंदिर, दानी गेट आणि शिप्रा नदीचा हा भाग प्राचीन उज्जैनचा महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. हा भाग सिंदिया राज्याचा 300 वर्ष जुना इतिहास, राजा भोज काळातील चौबीस खंबा क्षेत्र आणि त्यानंतर बनलेल्या सती गेटच्या वारशाची जोडला गेला आहे.
मूर्ती हटवायला विरोध
सनातन परंपरेनुसार प्राण-प्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचं धार्मिक महत्त्वं असतं, त्यामुळे भक्तांच्या भावनांचा आदर केला जावा, अशी मागणी संतांनी केली आहे. तर हनुमानाला स्वत:लाच इथून जायचं नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत. हनुमानाची मूर्ती हटवण्यासाठी त्याच्यावर प्लास्टिक टाकलं गेलं, तेव्हा तिथे विजेच्या पोलवर स्पार्किंग झालं आणि त्यामुळे ब्लास्ट झाल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे.
काय म्हणाले पुरातत्व तज्ज्ञ?
याबाबत विक्रम कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे प्रोफेसर डॉ. रमण सोलंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हनुमानाची मूर्ती मालवाच्या बेसॉल्ट दगडापासून बनली आहे, ही मूर्ती जवळपास एक हजार वर्ष जुनी राजा भोज काळातील मूर्ती निर्माणाच्या परंपरेतील असू शकते. परमार काळ आणि राजा भोजच्या वेळी अशाप्रकारे मजबूत बेसॉल्ट दगडावर मूर्ती बनवल्या जायच्या, असं डॉ. सोलंकी म्हणाले. मंदिराचं स्थानही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. मूर्तीचं खरं वय आणि मूर्तीची स्थापना कधी झाली? हे पाहण्यासाठी वैज्ञानिक परिक्षण आणि तज्ज्ञांच्या तपासणीची गरज असल्याचं वक्तव्य डॉ. सोलंकी यांनी केलं आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) आणि मध्य प्रदेश पुरातत्व विभागाकडे अशाप्रकारच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेला खजाना सुरक्षित पद्धतीने स्थलांतरित करण्याचं स्पेशलायजेशन आहे. वैज्ञानिक तंत्राचा वापर करून तुम्ही मूर्तीचं कोणतंही नुकसान न करता स्थलांतर करू शकता, असं डॉ. सोलंकी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.