सांगली: सांगली जिल्हयात १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा पोलीस दलाने केलेल्या विशेष उपाययोजना आणि चोख नियोजनामुळे संपूर्ण उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार न पडता कायदा व सुव्यवरथा पूर्णपणे अबाधित राहिली. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ६,१०२ गणेशमूतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यात दीड दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, अकरावा दिवस तसेच अनंत चतुर्दशी आणि त्यानंतरच्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने श्रींच्या मूतींचे विसर्जन करण्यात आले.
उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध सामाजिक व प्रशासकीय घटकांशी संवाद साथचत विविध बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या ३४९ बैठका, ३५ मोहल्ला कमिटी बैठका, ५० शांतता समिती बैठका, ४७ पोलीस मित्र बैठका, २८ पोलीस-नागरीक समन्वय समिती बैठका, २५ मशिदींच्या मौलानावी मौलवींच्या बैठका, ५० इतर विभाग समन्वय बैठका, ४० डॉल्बी चालक व मालक बैठका, २६ मूर्तिकार व देखावे सादर करणाऱ्यांच्या बैठका आणि ५६५ गावभेटींचा समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या सुरळीत समन्वयासाठी १८३ प्हॉट्राॲप ग्रुप तयार करण्यात आले होते.
याशिवाय सुरक्षेची पूर्वतयारी म्हणून २८ दंगा काबू रंगीत तालमी, २५ दंगा काबू साहित्य तपासण्या, ३७ रूट मार्च घेण्यात आले आणि ७८ गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवण्यात आली.
सुरक्षा व्यवस्थेसाठी जिल्ह्यात १ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ पोलीस उपअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, १२१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,९२६ पोलीस अंमलदार, ९०० होमगार्ड आणि एसआरपीएफची १ कंपनी तैनात करण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार 'एक मंडळ एक अंमलदार योजना राबयत ६,१०२ गणेश मंडळांसाठी ८८ अधिकारी आणि १,०६२ अंमलदारांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उत्सव काळात कायदा अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार ७९९ जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
स्वनी प्रदूषण नियंत्रण व आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दलाने कड़क पावले उचलली, नियमभंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात २६, सांगली शहरात १२, मिरज ग्रामीणमध्ये ९. शिराळ्यात २, तर मिरज शहर आणि आष्टा येथे प्रत्येकी १ असे एकूण ५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक संजयनगर पोलीस ठाण्यातील ५ आणि मिरज शहर पोलीस ठाण्यातील १५ खटले तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे,
नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेता डीजे, डॉल्बी, प्लाझगा, बीम लाईट, लेझर लाईट, प्रेशरगिड, विक्षिष्ट गुखवटे आणि कागदी बॉग्य वापरावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलग १६३ नुसार कडक बंदी घालण्यात आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
कोणात्याही आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी २ स्ट्रायकिंग पथके, २ दंगल नियंत्रण पथके आणि १ शीघ्र कृती दल (CQRT) राखीव ठेवण्यात आले होते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी छेडछाड विरोधी पथके, गुड मॉर्निंग पथके आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी २५ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकान्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या यशस्वी बंदोबस्ताबद्दल पोलीस दलाचे कौतुक करत नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.