देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा धुरळा लवकरच उडणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या ५ प्रमुख राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची वेळ आता जवळ येत आहे. या सर्व राज्यांमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी ते मार्च २०२७ या कालावधीत पार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची जनगणना (Census) आणि निवडणूक कामांमधील ड्युटीचा प्रशासकीय ताण टाळण्यासाठी निवडणुका आणि जनगणनेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या ५ राज्यांपैकी मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ सर्वात आधी १३ मार्च २०२७ रोजी संपत असल्याने, निवडणूक आयोग त्याआधीच सर्व ५ राज्यांतील निवडणूक प्रक्रिया एकत्रितपणे पार पाडण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ २२ मे २०२७ पर्यंत असला तरी प्रशासकीय सोयीसाठी यूपीमध्ये कार्यकाळ संपण्याच्या सुमारे २ महिने आधीच मतदान पूर्ण करून घेतले जाण्याची शक्यता आहे.
२०२२ मध्ये सर्व पाच राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यात आल्या. २०२७ मध्येही या राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग पारंपरिक पद्धतीनुसार, म्हणजेच पहिल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुका विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांतर्गत, तो राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी कधीही निवडणुका घेऊ शकतो.
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अनेक टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या उदाहरणांवरून कमी टप्प्यांची शक्यता वर्तवली जाऊ शकते. जर निवडणूक आयोगाने बिहारप्रमाणे निवडणूक दोन टप्प्यांपुरती मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला, तर मतदान फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते.
निवडणूक होणाऱ्या तीन राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. उर्वरित दोन राज्यांमध्ये ती सुरू आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोग एसआयआर घेण्याची शक्यता कमी आहे. एसआयआरच्या अखेरीस, उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची संख्या १३.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर गोव्यात १०.२% आणि मणिपूरमध्ये ७.६% घट झाली आहे. पंजाब आणि उत्तराखंडच्या अंतिम मतदार याद्या पुढील काही महिन्यांत प्रसिद्ध केल्या जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.