🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंमत असेल तर उलटे टांगून दाखवा; राजू शेट्टी यांचे राजेश क्षीरसागर यांना प्रत्युत्तर

हिंमत असेल तर उलटे टांगून दाखवा; राजू शेट्टी यांचे राजेश क्षीरसागर यांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : हिंमत असेल दम तर मला उलटे टांगून दाखवाच असे थेट आव्हानच माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना दिले आहे. राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग बाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामांमध्ये अडथळा आणणारे राजू शेट्टी यांना उलटे टाकून धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला होता.

त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना राजू शेट्टी म्हणाले की, राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस आहे आणि त्याच्या एक-एक आख्यायिका या 'अरेबियन नाइट्स'पेक्षाही प्रचंड सुरस, चमत्कारिक आहेत. क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या नादाला लागायचे काहीच कारण नाही. शेतकऱ्यांचा हिसका त्यांना अजून कळलेला नाही. असेल दम तर टांगून दाखवाच उलटा मला, असे माझे म्हणणे आहे.

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना शेट्टी यांनी कोल्हापूरच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित केला. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे एक अस्सल कोल्हापुरी म्हणून मी त्याला विरोध करणारच,असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पळपुटे क्षीरसागर – पोवार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनीही आमदार क्षीरसागर यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, राजू शेट्टी यांची हयात शेतकऱ्यांच्या हितासाठी, संघर्षासाठी गेली आहे. ते शेतकऱ्यांचे दैवत आहेत. राजेश क्षीरसागर यांच्यासारखे कंत्राटदार, सोनार, डॉक्टर, व्यापारी यांना धमकी देऊन लुटणारे नाहीत. जयप्रभा स्टुडिओ बाबत तुमचे व्यवहार जगजाहीर आहेत. मागील वेळीही राजू शेट्टी यांच्या संपत्तीवर क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात येऊन संपत्ती तुमच्याकडे सोपवण्याचे जाहीर केले. पण क्षीरसागर यांनी पळ काढला. क्षीरसागर यांनी कोल्हापुरात १०० कोटी निधीतून केलेल्या रस्त्याची वर्षभरातच चाळण झाली आहे. विनाकारण शेट्टी यांच्यावर आरोप कराल तर शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पोवार यांनी क्षीरसागर यांना दिला आहे.

शेट्टी काय म्हणाले होते?

जून २०२६ मध्ये सांगली आणि परिसरात शक्तीपीठ महामार्गासाठी प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी ड्रोन व पोलिसांच्या मदतीने जमीन मोजणीचे काम सुरू होते. त्यावरून राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर संताप व्यक्त करताना पोलिसांना ‘खाकी वर्दीतील दरोडेखोर’ म्हटले होते. मध्यरात्रीच्या कारवाईवर आक्रमक होत राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर, प्रशासनावर आणि पोलिसांवर तीव्र शब्दांत टीका केली. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात घेतलेल्या या भूमिकेचा निषेध करताना त्यांनी अधिकाऱ्यांचा व पोलिसांचा उल्लेख खाकी वर्दीतील दरोडेखोर असे केले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.