🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवी मुंबई मनपा रुग्णालयाचा पुन्हा एकदा जीवघेणा निष्काळजीपणा; रुग्णाला लावले एक्सपायरी सलाईन, प्रकृती चिंताजनक!

नवी मुंबई मनपा रुग्णालयाचा पुन्हा एकदा जीवघेणा निष्काळजीपणा; रुग्णाला लावले एक्सपायरी सलाईन, प्रकृती चिंताजनक!

नवी मुंबई : काही महिन्यापूर्वी नवी मुंबई मनपा रुग्णालयात गरोदर महिलांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता. एक गर्भवती फोर्टिस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती.

त्याचीच पुनरावृत्ती वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. गोपीराम खडसे नामक एका ५० वर्षीय इसमाला मुदत संपलेले सलाईन लावल्याने रुग्णाची तब्येत खालवली आहे. त्यामुळे खडसे यांना आयसीयूमध्ये दाखल करत व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात जुलै २०२६ मध्ये एक्सपायर झालेले सलाईन रुग्णाला लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ५० वर्षीय गोपीराम खडसे हे उपचारासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांना लावण्यात आलेले सलाईन एक्सपायर असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले.

एक्सपायरी सलाईनमुळे रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सध्या खरात यांना बाजूच्याच फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित डॉक्टर, सिस्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.