🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तान कंगाल! लग्नात १च डिश अन् नव्या गाड्यांवर बंदी; 'या' देशात थेट लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध!

पाकिस्तान कंगाल! लग्नात १च डिश अन् नव्या गाड्यांवर बंदी; 'या' देशात थेट लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध!


मध्य पूर्वेतील युद्ध आणि वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या भीषण इंधन संकटामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशात थेट कोरोना काळातील लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध आणि कठोर काटकसरीचे धोरण लागू केले आहे. 

नवीन गाड्यांच्या खरेदीवर पूर्ण बंदी, मंत्र्यांच्या परदेशवारीवर लगाम आणि लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी फक्त ‘एकच पदार्थ’ वाढण्याचे फर्मान सरकारने सोडले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टूडे' या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळ सचिवालयाने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून हे नियम तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

रात्री ९ वाजताच बाजारपेठा बंद, मॉल आणि हॉटेल्सवरही मर्यादा

इंधनाची बचत आणि विजेचा वापर कमी करण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांवर कडक मर्यादा घातल्या आहेत:
दुकाने आणि मॉल: सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, बाजारपेठा आणि ग्रॉसरी स्टोअर्स रात्री ९ वाजेपर्यंत बंद करावी लागतील.

लग्नाचे हॉल: लग्नकार्याचे हॉल आणि इतर मंगल कार्यालये रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

रेस्टॉरंट्स: हॉटेल्स, कॅफे आणि खानावळी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतील (पार्सल आणि होम-डिलीवरी सेवांना यातून सूट आहे). 
अत्यावश्यक सेवा: औषधांची दुकाने, रुग्णालये, पेट्रोल-सीएनजी पंप, ई-व्ही चार्जिंग स्टेशन आणि आयटी/कॉल सेंटर्स या निर्बंधातून वगळण्यात आले आहेत.

सरकारी उधळपट्टीवरही लगाम! गाड्यांच्या खरेदीवर बंदी आणि इंधनात ५०% कपात
पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत खर्चात प्रचंड कपात केली आहे. सर्व प्रकारच्या सरकारी वाहनांच्या खरेदीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरकारी गाड्यांसाठी मिळणाऱ्या इंधनाच्या कोट्यात ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

सशस्त्र दलांची आणीबाणीच्या कामातील वाहने वगळता, इतर प्रशासकीय विभागांना या ५० टक्के कपातीचा फटका बसणार आहे. याशिवाय आयटी क्षेत्र सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तूंच्या सरकारी खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे.
मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द; विमान प्रवासासाठी ‘इकॉनॉमी क्लास’ अनिवार्य

सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर पुढील तीन महिन्यांसाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाच्या किंवा अपरिहार्य परदेशी बैठकांसाठी आता पाकिस्तानचे त्या-त्या देशातील राजदूतच प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील.

ज्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधीला परदेशात जाणे टाळता येणार नाही, तेथे मंत्री, खासदार आणि उच्च अधिकाऱ्यांना केवळ ‘इकॉनॉमी क्लास’नेच प्रवास करावा लागेल. व्हीआयपी  किंवा बिझनेस क्लास प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी मेजवान्या आणि सेमिनारवर बंदी
सरकारी मेजवान्यांवर बंदी: परदेशी शिष्टमंडळांचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या सरकारी रात्रीच्या जेवणांवर बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाईन बैठका: सरकारी विभागांना शहराबाहेरील बैठकांऐवजी दूरध्वनीद्वारे किंवा व्हर्च्युअल कॉन्फरन्स घेण्याचे निर्देश दिले आहेत.

हॉटेल बुकिंगवर रोख: कोणताही सरकारी सेमिनार किंवा वर्कशॉप खाजगी हॉटेल्समध्ये आयोजित न करता केवळ सरकारी सभागृहातच घ्यावा लागेल.
लग्नसमारंभात ‘वन-डिश’ नियम लागू

किंवा व्हर्च्युअल कॉन्फरन्स घेण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल बुकिंगवर रोख: कोणताही सरकारी सेमिनार किंवा वर्कशॉप खाजगी हॉटेल्समध्ये आयोजित न करता केवळ सरकारी सभागृहातच घ्यावा लागेल.

लग्नसमारंभात ‘वन-डिश’ नियम लागू
सामान्यांवर प्रभाव पाडणाऱ्या निर्णयांमध्ये लग्नसमारंभातील अन्नाची नासाडी रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘सिंगल डिश’ नियम लागू केला आहे. ‘डॉन’  या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता कोणत्याही लग्नकार्यात किंवा समारंभात पाहुण्यांना फक्त एकच मेनू किंवा पदार्थ वाढता येईल.

मध्य पूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि पुरवठा साखळी खंडित झाली आहे. पाकिस्तानकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने इंधनाची आयात कमी करणे आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करणे हाच या कडक निर्बंधांमागील मुख्य उद्देश आहे.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.