🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंदूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! राहुल गांधींना प्रपोज करायला दिल्लीची तरुणी पोहोचली; सगळ्यांसमोर सांगणार 'दिल की बात'!

इंदूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! राहुल गांधींना प्रपोज करायला दिल्लीची तरुणी पोहोचली; सगळ्यांसमोर सांगणार 'दिल की बात'!


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' हा कार्यक्रम देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमात तरुण मुली, कॉलेजात शिकणारे विद्यार्थी शिक्षणाविषयी आपापल्या समस्या मांडत आहेत. हाच कार्यक्रम आज इंदोरला होत असून एक तरुणी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी तसेच त्यांना लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचली आहे.

करीना कपूर 'त्यांना' डेट करण्याची इच्छा व्यक्त करू शकते, तर मी का नाही?
राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. जर अभिनेत्री करीना कपूर राहुल गांधींना डेट करण्याची इच्छा व्यक्त करू शकते, तर एक सामान्य मुलगी त्यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्न का पाहू शकत नाही? असा प्रश्न तरुणीने केला आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने तरुणांच्या प्रश्नांवर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधतात, त्याचा आपल्यावर मोठा प्रभाव पडल्याचे तिने सांगितले. याच कारणामुळे ती दिल्लीवरून खास राहुल गांधींना भेटण्यासाठी आणि ऐकण्यासाठी इंदोरला आली आहे.
खुल्या मंचावरून प्रपोज करणार

या कार्यक्रमात केवळ मीच नाही तर अनेक मुली राहुल गांधींना खुल्या मंचावरून प्रपोज करण्याची इच्छा बाळगून आहेत, असे संबंधित तरुणीने सांगितले. राहुल गांधींचे विचार तरुणांना, विशेषतः विद्यार्थिनींना आकर्षित करत आहेत, असे तिने आवर्जून सांगितले.

'छात्रों की गूंज' कार्यक्रम देशभरात चर्चेत
काँग्रेस पक्षाकडून इंदोरमधील रीजनल पार्क येथील मैदानावर 'छात्रों की गूंज' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्षाने या मैदानाला 'भारत जोडो ग्राउंड' असे नाव दिले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा पाचवा टप्पा इंदोरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याआधी कोटा (१७ जून), डेहराडून (१७ जुलै), प्रयागराज (८ ऑगस्ट) आणि पुणे (२२ ऑगस्ट) येथे 'छात्रों की गूंज' कार्यक्रम पार पडले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी पेपर लीक, खर्चिक होत असलेले शिक्षण, सरकारी भरतीतील अनियमितता आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.