जयपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये मोठा खेळ झाला आहे. चार वॉर्डामध्ये ईव्हीएम मशिनच्या बिघाडानंतर पुनर्मतदान झालं होतं. त्याचे आता निकाल आले असून या निकालानंतर सत्तेचं संपूर्ण गणितच बदलून गेलं आहे. ज्या चार ठिकाणी पुन्हा मतदान झालं होतं त्या चारही जागा काँग्रसच्या खात्यात गेल्या असून आता काँग्रेसचा आकडा हा ५३ वरून थेट ५७ झाला आहे. जर भाजप ७८ जागांवर अडखळली आहे. १५ अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.
भाजपचा बहूमताचा आकडा फसला
१५० सदस्यांच्या सभागृहात भाजप बहुमतापासून थोडक्या जागांनी मागे राहिली आहे. बहुमतासाठी भाजपला अजून २ जागांची गरज आहे. मात्र २०१९ च्या विष्णू लाटा कांडचे भूत अजून मानगुटीवर असून काँग्रेस अन् अपक्ष यांचे मिळून ७२ अशी संख्या होते. त्यामुळं भाजपची धाकधूक वाढली आहे. आता मेअर पदाच्या दावेदारीवरून भाजपमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची एन्ट्री झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री देखील थेट हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. त्यामुळं जयपूर महापौर निवडणूक रंजक वळणावर पोहचली आहे.
पुनः मतदान झालेल्या चारही जागांवर काँग्रेस
ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यालनं वॉर्ड क्रमांक ९, १८,२५ आणि ३५ इथं पाच बूथवर पुन्हा मतदान घेण्यात आलं होतं. गुरूवारी श्री भवानी निकेतनमध्ये झालेल्या मतमोजणीत काँग्रेने चारही जागांवर विजय मिळवला.
वॉर्ड क्रमांक ९ - काँग्रेसचे कैलाश देवी यांनी ७६४ मतांनी विजय मिळवला.
वॉर्ड क्रमांक १८ - काँग्रेसच्या वंदिता शर्मा यांनी १८१ मतांनी विजय मिळवला.
वॉर्ड क्रमांक २५ - रेखा देवी सैनी यांनी ३९७ मतांनी विजय मिळवला.
वॉर्ड क्रमांक ३५ अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सुरेश यादव यांनी १४९ मतांनी विजय मिळवला
महापौर पदासाठी RSS ते दिल्लीपर्यंत फिल्डिंग
७८ जागा जिंकून देखील भाजपमध्ये महापौर पदासाठी धाकधूक वाढली आहे. सुनील कोठरी, पुनीत कर्णावट, शैलेंद्र भार्गव, सुभाष सिंघी, विमल अग्रवाल आणि भवानी सिंह राजावत यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. आता अनुराधा माहेश्वरी आणि विजय अग्रवाल यांचे देखील नाव पुढे येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक नवीन आणि निष्पक्ष चेहरा देण्यासाठी राजस्थानातील एक केंद्रीय मंत्री तसेच केंद्रातील दोन मोठे नेते, संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. त्यामुळे एका प्रसिद्ध धार्मिक स्थळाशी जोडल्या गेलेल्या एका वेगळ्याच नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.