🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओल्ड मंक मद्याच्या विक्रीवरील बंदी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम स्थगिती देण्यास नकार

ओल्ड मंक मद्याच्या विक्रीवरील बंदी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम स्थगिती देण्यास नकार


मुंबई: रम आणि व्हिस्की उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केल्याने ब्रँडस्‌च्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीला तातडीने स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला. प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही.घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए. अखंड यांच्या खंडपीठाने उपलब्ध साठा विकण्याची परवानगी दिल्यास ती अंतिम सवलत दिल्यासारखे होईल, असे निरीक्षण नोंदवत या विक्री बंदीला अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार देत याचिकेची सुनावणी ८ सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली. 
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने लेबलिंगचे निकष आणि परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही प्रमुख ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात मॅकडोवेल्स रम बनवणारी 'युनायटेड स्पिरिटस्‌ लिमिटेड' आणि 'ओल्ड मॉन्क'चे उत्पादक मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने प्रस्तावित केलेल्या नवीन सुधारित लेबलबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक सूचना आणि भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.