हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर
हिमालय म्हटलं की डोळ्यासमोर बर्फाच्छादित पर्वत, उंचच उंच शिखरं आणि थंडगार वातावरण उभं राहतं. पण याच हिमालयात आता बर्फ झपाट्याने वितळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं तापमान आणि जीवाश्म इंधनाचा वापर यामुळे हिमनद्या वितळत असल्याचं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, एव्हरेस्टवरील ग्लेशियरबाबत झालेल्या एका नव्या अभ्यासात आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.
नेपाली आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी केलेल्या या अभ्यासानुसार, माउंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांकडून होणारं लघवीचं प्रमाण ग्लेशियरवर परिणाम करतंय. त्यामुळे एका सत्रात जवळपास २५०० टन बर्फ वितळतोय.
एव्हरेस्ट बेस कॅम्प हा खुम्बू ग्लेशियरवरच उभारला जातो. गिर्यारोहणाच्या हंगामात इथे मोठी गर्दी असते. दरवर्षी तब्बल १,६०० टेंट उभारले जातात. या टेंटमध्ये स्वयंपाकघर, शॉवर, जनरेटर, वाय-फायसारख्या सुविधाही असतात. या सगळ्यामुळे ग्लेशियरच्या परिसरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते.
उंचावर गेल्यानंतर शरीराला जास्त पाण्याची गरज भासते. त्यामुळे गिर्यारोहक मोठ्या प्रमाणात पाणी पितात आणि साहजिकच लघवीचं प्रमाणही वाढतं. अभ्यासानुसार, २०२३ च्या गिर्यारोहण हंगामात बेस कॅम्प परिसरात दररोज सुमारे ६,७६६ लिटर मूत्र बाहेर टाकलं गेलं.
शरीरातून निघणाऱ्या लघवीद्वारे साधारण ३७ अंश सेल्सिअस तापमान बाहेर पडतं. त्यामुळे त्यातील उष्णतेचा काहीसा परिणाम बर्फावर होतो. मात्र, वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे की मानवी लघवी हे ग्लेशियर वितळण्याचं सर्वात मोठं कारण नाही. ग्लेशियर वितळण्यामागे मोठं संकट वाढतं तापमान आहे.
वर्ष २००० नंतर हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग याआधीच्या काळाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. बेस कॅम्पचा पृष्ठभागही दरवर्षी सुमारे ०.२८ अंश सेल्सिअसने गरम होत आहे. एव्हरेस्टवर माणसाची वाढती वर्दळ आणि बदलतं हवामान त्यामुळे हिमालयासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.