🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये सोडले प्राण, नळदुर्ग प्रकरणात मोठी अपडेट

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये सोडले प्राण, नळदुर्ग प्रकरणात मोठी अपडेट


दोन दिवसांपूर्वी धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावरील धाराशिवच्या नळदुर्ग येथील उपळी बुर्जावरून राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह उडी मारून आत्महत्या केली. यावेळी आई अश्विनी आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीररीत्या जखमी झाली होती आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसांनी तिने सुद्धा आयसीयूमध्ये प्रमाण सोडले.

केक कापल्यावर काहीच वेळात केली आत्महत्या :
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली होती. मात्र मागच्या काही वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. अश्विनी पौळ यांचा पती मनोहर सुद्धा कुस्तीपटू होता. सध्या तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अश्विनी या सासरच्या जाचाला कंटाळून मागील तीन महिन्यापासून माहेरी राहत होत्या. अश्विनी पौळ यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या माहितीनुसार अश्विनी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. 

यावेळी त्यांनी सोबत केक आणलेला आणि तो त्यांना गडावर कापायचा होता. मात्र सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवलं आणि त्यामुळे अश्विनी यांनी मुलांसह गडाच्या दरवाजातच केक कापला आणि मग तीन मुलांसह त्या गडावर गेल्या. त्यानंतर तीन मुलांसह त्यांनी नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली. यात अश्विनी सह मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा साडेपाच वर्षाचा होता तर दोन लेकी या अडीच वर्षांच्या होत्या. सासरच्या जाचाला कंटाळून अश्विनीने हे टोकाचे पाऊल उचललं असा आरोप अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी केला आहे.
तिसऱ्या मुलीचाही मृत्यू :

अश्विनी पौळ आणि तीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले पती मनोहर पौळ व सासरा अंकुश पौळ यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली होती. घटनेत अश्विनी पौळ आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या अडीच वर्षांची मुलगी क्रांती पौळ हिचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेली क्रांतीची जुळी बहीण वीरा पौळ हिचादेखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.