🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका रीलमुळे फुटले बोगस आयएएस अधिकाऱ्याचे बिंग, तोतया महिला अधिकाऱ्याला अटक

एका रीलमुळे फुटले बोगस आयएएस अधिकाऱ्याचे बिंग, तोतया महिला अधिकाऱ्याला अटक


आयएएस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱया एका उच्चशिक्षित तोतया महिला अधिकाऱयाला अटक करण्यात आली आहे. तृप्ती सिंह राजपूत (30) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. 
मध्य प्रदेश विधानसभेच्या आवारात एक रील चित्रीत केल्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या रीलच्या आधारे तपास करत भोपाळ आणि अशोकनगर पोलिसांनी सापळा रचून तृप्ती आणि तिचा भाऊ सुधांशू सिंह या दोघांना अटक केली.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आमच्या या खोडय़ा पाहून आम्ही दोघी 'आयएएस' अधिकारी आहोत यावर कोणाचा विश्वास बसेल का? हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.


पतीलाही फसवले
तृप्तीने स्वतःच्या पतीलाही गंडवले होते. आपण आयएएस अधिकारी असल्याचा बनाव रचूनच पतीला लग्नासाठी तयार केले होते, असा दावा तिच्या पतीने केला असून सध्या त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. तिच्या घरातून बनावट सरकारी ओळखपत्रे, शासकीय लेटरहेड्स, नियुक्तीपत्रे, 'प्रशिक्षणार्थी आयएएस' असा उल्लेख असलेली सन्मानचिन्हे आणि भारत सरकारचा फलक लावलेली एक टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.