🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक


सक्तवसुली संचालनालयाने तूप बनवणारी कंपनीच्या कैलाश चंद मंगला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केलीय. ईडीने कारवाईनंतर सांगितलं की, तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरलं जाणारं तूप हे रिफाइंड पाम ऑइल, पामोलीन आणि वेगवेगळ्या रसायनांनी बनवलं होतं. 
केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या लाडुसाठी वापरलेल्याॉ तुपात भेसळ प्रकरणी हैदराबादमधील ईडी कार्यालयाने सुकृति फूड्सच्या कैलाश चंद मंगला यांना ताब्यात घेतलंय.
विशाखापट्टणमच्या पीएमएलए विशेष न्यायालयात कैलाश यांना हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. ईडीने दावा केला की, चौकशीत भेसळयुक्त तूप तयार करण्यात आलं होतं असं आढळून आलंय. हे तूप तयार करण्यासाठी रिफाइंड पाम ऑइल, पाम कर्नेल ऑइल, पामोलीन आणि एमजी ९०, मोनोग्लिसराइड्स, मायवेसिट सॉफ्ट ४०० तसंच एसिटिक एसिड एस्टरसह इतर रसायने वापरली होती. याच तुपाचा पुरवठा तिरुपती देवस्थानला केला जात होता.

2019 ते 2024 या कालावधीत तिरुपती देवस्थानला पुरवठा केलेल्या तुपाची किंमत जवळपास २३० कोटी रुपये होती. यात ९६ कोटी रुपयांचं भेसळयुक्त तूप मंगला यांच्याकडून तयार करण्यात आलं होतं. या प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये मंगला हे एक आहेत. भेसळयुक्त पदार्थांच्या खरेदीसाठी मंगला यांनी मदत केली होती. कारखान्याच्या परिसरातच भेसळयुक्त तूप तयार केलं. वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड एग्रो प्रॉडक्ट्स, एआर डेअरी फूडसह वेगवेगळ्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तूप पुरवठा केला. अशाच आरोपांखाली ईडीने याआधी भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी मिल्क नावाच्या कंपनीच्या विपिन जैनला अटक केली होती.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.