🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हवेत उडणाऱ्या नोटा अन् लोकांची पळापळ! स्टेशनवर ५०० च्या नोटा गोळा करण्यासाठी उडाला गोंधळ

हवेत उडणाऱ्या नोटा अन् लोकांची पळापळ! स्टेशनवर ५०० च्या नोटा गोळा करण्यासाठी उडाला गोंधळ

सोशल मीडियावर सर्वात जळदगतीने एखाद्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून पनवेल (मुंबई) येथे जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमधून अचानक पाचशे रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्याचे पाहायला मिळाले.

या नोटा गोळा करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये अक्षरशः धावपळ उडाली. काही वेळातच अनेकांनी मिळेल तितक्या नोटा गोळा केल्या आणि तेथून निघून गेले.

ही घटना पीपीगंज रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. गोरखपूरहून पनवेलकडे जाणारी एक्सप्रेस ट्रेन पीपीगंज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या मार्गावरून जात होती. या एक्सप्रेसला पीपीगंज स्थानकावर थांबा नसल्याने ट्रेन वेगाने पुढे जात होती. त्याच वेळी ट्रेनमधून कोणीतरी पैशांनी भरलेली प्लास्टिकची पिशवी खाली फेकल्याचे सांगण्यात येते.

अचानक हवेत उडू लागल्या नोटा

मिळालेल्या माहितीनुसार, पिशवीमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. ट्रेनमधून खाली फेकल्यानंतर काही कारणाने पिशवी उघडली आणि त्यातील नोटा वाऱ्यामुळे हवेत उडू लागल्या. सकाळच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या लोकांचे लक्ष या नोटांकडे गेले.

सुरुवातीला अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मात्र, हवेत उडणाऱ्या नोटा प्रत्यक्ष दिसू लागल्यानंतर स्थानकावर उपस्थित नागरिकांनी त्या गोळा करण्यासाठी धाव घेतली. काही जण हवेत उडणाऱ्या नोटांच्या मागे धावत होते, तर काही जण रेल्वे रुळांच्या आणि स्थानक परिसरात पडलेल्या नोटा उचलत होते.

काही मिनिटांतच परिसरात पैशांची नाणी नाही तर चक्क पाचशे रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. ज्याच्या हाती जितक्या नोटा लागल्या, तितक्या त्याने गोळा केल्याचे सांगण्यात येते.

पैसे नेमके कोणाचे?

रेल्वे स्थानकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या परिचिताला पैसे देण्यासाठी मोठी रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवली असावी. पीपीगंज स्थानकावर ट्रेन थांबत नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून ही पिशवी खाली फेकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, पिशवी खाली पडताच ती उघडली आणि त्यातील नोटा वाऱ्यामुळे उडून परिसरात विखुरल्या. त्यामुळे पैसे घेण्यासाठी ज्याच्यासाठी ही रक्कम पाठवण्यात आली होती, त्या व्यक्तीपर्यंत ती पूर्णपणे पोहोचली की नाही, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेतील सर्वात मोठे गूढ म्हणजे ही रक्कम नेमकी कोणाची होती आणि ती कोणाला देण्यात येणार होती? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.