🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क विहिरीचं पाणी पेटलं, सांगलीच्या उमदीत निसर्गाचा चमत्कार? उसळली मोठी गर्दी

चक्क विहिरीचं पाणी पेटलं, सांगलीच्या उमदीत निसर्गाचा चमत्कार? उसळली मोठी गर्दी


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील उमदी इथं एका विहिरीतील पाण्याला पेट्रोलसारखा वास येत आहे. इतकेच नाही तर हे पाणी दांडात सोडल्यावर आणि त्यावर माचिसची पेटती काडी धरल्यावर त्याला आग लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब समोर येताच पंचक्रोशीतील लोकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून या विहिरीतील पाण्याला पेट्रोल सारखा वास होता. त्यामुळे ते पाणी ना पिकांना देता येत होते ना जनावरांना. हे पाणी पिण्यासही योग्य नव्हते. पाण्याला पेट्रोलसारखा वास येत असल्याने हे पाणी प्लॅस्टिक बाटलीत भरण्यात आले. तेव्हा. पाण्यावर चक्क पेट्रोल तरंगले.

उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काल सायंकाळी पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, त्या पाण्याच्या ठिकाणी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. ज्या ठिकाणापर्यंत पाणी गेले होते, त्या भागातही जाळ जाणवल्याचे सांगण्यात आले.

तर काहींच्या परिसरात कुठे तरी पेट्रोलची पाईपलाईन फुटली असावी आणि त्यातील पेट्रोल जमिनीत झिरपून ते या विहिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोत मिसळले असेल. त्यानंतर हे पाणी विहिरीत जमा होत असल्याने त्याला पेट्रोलचा वास येत असावा. प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.