🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking!जत हादरले! महापुरुषाचे पोस्टर हटवल्यावरून डफळापूरमध्ये तुफान राडा; धारदार शस्त्रे, काठ्या आणि दगडफेकीत ७ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक!

Big Breaking!जत हादरले! महापुरुषाचे पोस्टर हटवल्यावरून डफळापूरमध्ये तुफान राडा; धारदार शस्त्रे, काठ्या आणि दगडफेकीत ७ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक!


जत / डफळापूर महापुरुषाचे पोस्टर हटवल्याच्या वादातून जत तालुक्यातील डफळापूर येथे दोन गटांत अत्यंत तीव्र स्वरूपाची हिंसक चकमक उडाली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या या भांडणाने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर धारदार शस्त्रे, काठ्या आणि तुफान दगडफेक करण्यात आली. या भीषण हाणामारीत ७ जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ​घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण डफळापूर गावाला छावणीचे स्वरूप आले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल नियंत्रण पथक (RCP) आणि प्रचंड पोलीस ताफा गावात तैनात करण्यात आला आहे.

​किरकोळ वादातून पेटली संघर्षाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, जत येथील एका चौकात एका महापुरुषाचे पोस्टर लावले होते. अज्ञात व्यक्तीने हे पोस्टर बाजूला काढून ठेवल्याचे समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि हुज्जत झाली, मात्र काही वेळातच या वादाचे पर्यवसान तुफान राड्यात झाले.

​धारदार हत्यारांचा वापर अन् तुफान दगडफेक
राडा वाढल्यानंतर दोन्ही बाजूंच्या टोळक्यांनी हातात धारदार हत्यारे, काठ्या आणि दगड घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला. अचानक सुरू झालेल्या या दगडफेकीमुळे चौकात आणि परिसरात प्रचंड पळापळ व घबराट पसरली. या हिंसक हल्ल्यात एकूण सात नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडले.
​जखमींवर मिरज सिव्हिलमध्ये उपचार; एसपी तुषार दोशी यांनी घेतली भेट

घटनेतील सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी थेट मिरज सिव्हिल रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचाराची माहिती घेतली.

गावात कडेकोट बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणात
घटनेनंतर डफळापूरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी दंगल नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. सध्या गावात शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या पूर्ण नियंत्रणात आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले असून जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील तपास करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.