🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काका आमदार अन्‌ पुतणीची चंगळ! ड्युटीवर 'नावालाच', तरी महिना ७० हजारांचा पगार खिशात!

काका आमदार अन्‌ पुतणीची चंगळ! ड्युटीवर 'नावालाच', तरी महिना ७० हजारांचा पगार खिशात!


बंगळुरू: 'नम्मा क्लिनिक'मधील महिला वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. अंकिता यारागलनं नोकरीवर न जाता दर महिन्याला ७५ हजार रुपये घेतला. सोबतच एका खासगी वैद्यकीय कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षणदेखील सुरू ठेवलं. हा प्रकार समोर येताच जिल्हा प्रशासनानं डॉ. अंकिता यारागल यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कामावर न जाता फुकट पगार घेणाऱ्या डॉ. अंकिता यारागल यांचे काका बागलकोटचे आमदार आहेत. उमेश मेती असं त्यांचं नाव आहे. तर अंकिता यारागल यांचे वडील डॉ. राजकुमार यारागल जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. अंकिता यांची नियुक्ती एप्रिल २०२५ मध्ये वाम्बे कॉलनी येथील नम्मा क्लिनिकमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली होती. 

स्थानिक नागरिक आणि रुग्णांच्या तक्रारींनंतर हा सगळा घोटाळा उजेडात आला. बागलकोटच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरस्वती मागी यांनी दवाखान्याला अचानक भेट दिली. तेव्हा डॉ. अंकिता तिथे नव्हत्या. डॉ. सरस्वती यांनी तिथे असलेल्या रुग्णांकडे याबद्दल विचारणा केली. तेव्हा डॉ. अंकिता अनेक महिन्यांपासून दवाखान्यात येतच नसल्याची आणि नर्सेसकडून रुग्णांना औषधं दिली जात असल्याची धक्कादायक माहिती डॉ. सरस्वती यांना समजली.

बागलकोट जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाले यांनी जारी केलेल्या नोटिशीनुसार, डॉ. अंकिता ३ मार्च २०२६ पासून दवाखान्यात गेल्याच नव्हत्या. आपल्या अनुपस्थितीची माहिती त्यांनी कोणालाही दिली नव्हती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या पहिल्या तपास बैठकीला डॉ. अंकिता अनुपस्थित राहिल्या. यानंतर त्यांना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाली १० वाजता जिल्हा पंचायत कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. अनुपस्थित राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा देण्यात आला. डॉ. अंकिता मार्च २०२६ पासून बागलकोटच्या एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयातून पॅथॉलॉजीमध्ये एमडीचा अभ्यास करता करता सरकारी पगार घेत होत्या का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार सरकारी आरोग्य सेवेत असताना परवानगीशिवाय पूर्णवेळ पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणं आणि पगार घेणं वैद्यकीय आणि प्रशासकीय नियमांचं उल्लंघन आहे. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे नवं वळण आलं. डॉ. अंकिता यांना पदावरून हटवण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार यारावल यांनी काढला. ते डॉ. अंकिता यांचे वडील आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.