🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

SBI मध्ये नोकरीची धमाकेदार संधी! वर्षाला मिळणार २.५ कोटींचे भरभक्कम पॅकेज; २४ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

SBI मध्ये नोकरीची धमाकेदार संधी! वर्षाला मिळणार २.५ कोटींचे भरभक्कम पॅकेज; २४ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज


देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया ‘ग्रुप चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर’ या पदासाठी अर्ज मागवत आहे. या पदासाठी वार्षिक २.५ कोटी रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. निवडलेल्या उमेदवाराकडे बँकेच्या सायबर सुरक्षा धोरणाचे आणि सुरक्षा कामकाजाच्या नेतृत्वाची धुरा असेल. एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर एका अधिसूचनेद्वारे या रिक्त पदाची घोषणा केली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून ती २४ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

कोण अर्ज करू शकते?

एसबीआयच्या संकेतस्थळावरील जाहिरातीनुसार, अर्जदाराकडे संबंधित आयटी क्षेत्रातील अनुभव असणे आणि वयोमर्यादेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. निवडीसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे आहे. याचा अर्थ असा की, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अर्जदाराचे वय ५७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, अर्जदाराकडे आयटी क्षेत्रात १५ ते २० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. याचबरोबर केवळ भारतीय नागरिकच या पदासाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
एसबीआयमधील ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर’ या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी, उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांमधील B.Tech किंवा B.E. पदवी, किंवा नमूद केलेल्या शाखांमधील समतुल्य पदवी (किमान ५०% गुणांसह) असावी.
किंवा

MCA किंवा M. Tech/ M. Sc संगणक विज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा या विषयांमध्ये किंवा उपरोक्त शाखांमधील समकक्ष पदवी असावी.

पगार
निवड झालेल्या ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर’ची नियुक्ती मुंबई किंवा नवी मुंबई येथे केली जाऊ शकते. एसबीआयने सांगितले आहे की, निवडलेल्या उमेदवाराला दिले जाणारे वेतन वाटाघाटींवर आणि अनुभवावर आधारित निश्चित केले जाईल. यामध्ये कमाल वार्षिक वेतन २.५ कोटी रुपये असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.