🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उमदी पोलिसांची धडक कारवाई: सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेल्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना अटक, १७.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!​

उमदी पोलिसांची धडक कारवाई: सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेल्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना अटक, १७.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!


​उमदी :- तिकोंडी ते संख मार्गावर व्यापाऱ्याचा ट्रक अडवून बंदूक व चाकूचा धाक दाखवत तब्बल ९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात उमदी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाला मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​नेमकी घटना काय घडली?
​तामिळनाडू येथील शेळ्या-मेंढ्यांचे व्यावसायिक एम. रवी (वय ६०) हे आपल्या सहकाऱ्यांसह ट्रकमध्ये जात असताना, ११ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास भिवर्गी फाट्या जवळ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा ट्रक अडवला. दरोडेखोरांनी मारहाण करत आणि पिस्तूलसदृश शस्त्राने गंभीर दुखापत करण्याची धमकी देत, ट्रकच्या केबिनमधील लाकडी बॉक्स तोडून ९ लाख रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२) आणि ३११ अन्वये (गुन्हा रजि. नं. २८९) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​अटक करण्यात आलेले आरोपी

​गणेश बिराप्पा पांढरे (वय २१, रा. पांढरेवाडी, ता. जत)
​शांताराम बसवंत शिंदे (वय ३०, रा. आसंगी तुर्क, ता. जत)
​गौरव दादासो चौगुले (वय २३, रा. कुलाळवाडी, ता. जत)
​आकाश पाराप्पा नेमाणे (वय २३, रा. कुलाळवाडी, ता. जत)
(यांच्यासह अन्य ३ आरोपींचा शोध सुरू आहे.)

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण: ₹१७,४३,५००/-)
​रोख रक्कम: ₹१३,००,०००/-

​शस्त्रे: १ गावठी कट्टा (किंमत ₹४०,०००/-), १ जिवंत काडतूस (₹५००/-) आणि १ चाकू (₹१,०००/-)

​वाहने (३ दुचाकी): 

​हिरो एच.एफ. डिलक्स (MH-10-BH-2072) - ₹५०,०००/-
​हिरो स्प्लेन्डर (MH-43-BW-0036) - ₹५०,०००/-
​होंडा शाईन (MH-10-CC-4566) - ₹५०,०००/-
​मोबाईल (५ अँड्रॉइड हँडसेट): सॅमसंग एस-फोल्ड, वन प्लस, रेडमी, ब्लॅकबेरी व मोटो कंपनीचे मोबाईल (एकूण किंमत ₹२,५२,०००/-)

​तपास आणि पोलीस कस्टडी
​सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी तीन विशेष तपास पथके तयार केली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे १५ सप्टेंबर रोजी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाने सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली असून, पुढील अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.