दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी वकीलांसह मोतोश्रीवर जात आदित्य ठाकरेंना 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची नोटीस दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या वतीने त्यांच्या वकिलांनी मातोश्रीच्या गेटवरच नोटीस स्वीकारत सालियन यांच्यासह त्यांच्या वकिलांना माघारी पाठवलं.
यावेळी मातोश्रीबाहेर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसंच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानप्रकरणी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुखांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मातोश्रीबाहेर येऊन त्यांनी त्यासंदर्भातील नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे 18 मुद्द्यात समजून घ्या. दरम्यान, सतीश सालियन यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, आदित्य ठाकरे आणि इतरांना तात्काळ अटक करण्याची मागणी सीबीआयला लिहिलेल्या पत्रातून केली आहे..
नोटीसमधील महत्वाचे मुद्दे -
1) आदित्य ठाकरे यांनी 16 सप्टेंबर 2026 रोजी त्यांच्या अधिकृत 'X' (@AUThackeray) अकाउंटवरून इंग्रजी आणि मराठीत केलेल्या दोन पोस्टमुळे सतीश सालियान यांची बदनामी झाली असून, त्यासाठी 500 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागण्यात आली आहे.
2) सतीश सालियान यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नेहमी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला आहे; त्यांचा कोणताही राजकीय हेतू नाही किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाचे एजंट नाहीत.
3) सालियान यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सामूहिक बलात्कार, खून, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप केले असून त्यात आदित्य ठाकरेंच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली होती.
4) पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंद न केल्यामुळे सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही चौकशी सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची मागणी केली होती.
5) आदित्य ठाकरे यांनी कोर्टाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून सतीश सालियान यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता.6) उच्च न्यायालयाने ठाकरेंचा आक्षेप फेटाळून लावत, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिले, ज्यावरून सालियान यांची मागणी योग्य होती हे सिद्ध होते.7) सीबीआयने स्वतः कोर्टाला सांगितले होते की त्यांनी यापूर्वी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास केलेला नव्हता, ज्यामुळे ठाकरेंना पूर्वी 'क्लीन चीट' मिळाल्याचा दावा खोटा ठरतो.8) आदित्य ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या प्रकरणाला 'विनापुराव्यांचे चारित्र्यहनन' आणि 'राजकीय षडयंत्र' असे संबोधून सालियान यांच्या कायदेशीर लढ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.9) ठाकरेंनी ही विधाने जाणूनबुजून त्यांच्या अधिकृत अकाउंटवर केली जेणेकरून त्यांचे समर्थक, मीडिया आणि जनतेमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा आणि सालियान यांची प्रतिमा मलिन व्हावी.10) नावाचा उल्लेख नसला तरी संदर्भ स्पष्ट: पोस्टमध्ये थेट नाव घेतले नसले तरी, ज्यांनी कोर्टात याचिका केली आणि सीबीआय तपास आणला, ते सतीश सालियानच आहेत हे सर्वसामान्य वाचकाला सहज समजणारे आहे.
11) ठाकरेंच्या विधानांमुळे सामान्य जनतेत असा संदेश गेला की एका पित्याने आपल्या मुलीच्या मृत्यूचा वापर राजकीय सूड उगवण्यासाठी आणि ठाकरेंना बदनाम करण्यासाठी केला आहे, जे अत्यंत क्रूर आणि क्लेशदायक आहे.
12) न्यायालयाने स्वतः तपास करण्याचे आदेश दिलेले असताना, ठाकरेंनी या कायदेशीर प्रक्रियेला 'पुरावे नसलेली मोहीम' म्हणणे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहे.
13) ठाकरेंनी ही विधाने कोर्टाबाहेर, सार्वजनिक मंचावर केली आहेत, त्यामुळे त्यांना न्यायालयीन संरक्षणाचा (Privilege) अधिकार नाही आणि ते दिवाणी व फौजदारी कायद्यानुसार जबाबदार आहेत.
14) सीबीआयने एफआयआर नोंदवल्याच्या अगदी नंतरच ठाकरेंनी या पोस्ट केल्या, जेणेकरून सुरू झालेल्या कायदेशीर तपासाबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण करता येईल.
15) इंग्रजी पोस्टमुळे राष्ट्रीय स्तरावर आणि मराठी पोस्टमुळे महाराष्ट्रातील स्थानिक मतदारांमध्ये सालियान यांची बदनामी झाली, ज्यामुळे हे दोन स्वतंत्र गुन्हे ठरतात.16) आदित्य ठाकरेंना त्यांच्या अकाउंटवरील या पोस्टशी संबंधित सर्व डेटा, प्रिव्ह्यू, रीपोस्ट आणि मेसेजचे रेकॉर्ड नष्ट न करता सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.17) ठाकरेंचे हे कृत्य भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 356 (फौजदारी बदनामी) अंतर्गत गुन्हा ठरते, कारण त्यांनी जाणीवपूर्वक बदनामीकारक मजकूर पसरवला.18) ठाकरेंनी सतीश सालियान यांची इंग्रजी आणि मराठीत लेखी व जाहीर माफी मागावी आणि ती माफीनामा पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर किमान 90 दिवस 'पिन' करून ठेवावी.19) नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास, आदित्य ठाकरेंविरुद्ध कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.