🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना! एकाच रात्री १९ वर्षीय तरुणीवर २ वेळा सामूहिक अत्याचार; आधी दोघांनी, नंतर ५ जणांनी केला अत्याचार

महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना! एकाच रात्री १९ वर्षीय तरुणीवर २ वेळा सामूहिक अत्याचार; आधी दोघांनी, नंतर ५ जणांनी केला अत्याचार
वर्धा: महाराष्ट्रातील वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका १९ वर्षीय तरुणीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.

आधी एक रिक्षाचालकासह त्याच्या अन्य एक मित्राने तिच्यावर अत्याचार केला. मात्र काही वेळाने पुन्हा पाच जणांनी पीडितेला निर्जन ठिकाणी घेऊन जात तिच्या अब्रूचे लचके तोडले आहेत. या पाच जणांमध्ये आधीच्या दोन आरोपींचा देखील समावेश होता. 

या प्रकरणी याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत रिक्षा चालकासह पाच आरोपींना गजाआड केलं आहे. पोलिसांनी सुरुवातील या प्रकरणात १० ते १२ संशयितांना ताब्यात घेतलं होतं. यातील पाच जणांना पीडितेनं ओळखलं आहे. सर्व आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

प्रवासादरम्यान घडला अनुचित प्रकार
नागपूरच्या उमरेड परिसरातील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी घटनेच्या दिवशी चंद्रपूर येथे राहणाऱ्या आपल्या काकांकडे गेली होती. काकांना भेटून सायंकाळी ती रेल्वेनं परत निघाली. मध्यरात्री उशिरा ती वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आली. यानंतर २-३ किमी अंतरावर असलेल्या वर्धा स्थानकावर पोहोचली. मात्र, वर्ध्यात येईपर्यंत उशीर झाल्याने ती स्थानक परिसरातच थांबली होती. २३ तारखेच्या मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास एका ऑटो चालकाने तिला मदत करण्याचं आमिष दाखवून बाहेर नेलं. तेथे दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. 
स्थानकावर परतल्यानंतर पुन्हा अत्याचार

पहिल्या घटनेनंतर पीडितेची सुटका झाली होती. मात्र काही वेळातच आरोपीने त्याच्या इतर साथीदारांना फोन करून बोलवून घेतलं. सर्वांनी पीडितेला पुन्हा जबरदस्तीने एका निर्जन स्थळी घेऊन गेले. पीडितेच्या दाव्यानुसार, दोन वेगवेगळ्या टप्प्यांत मिळून तब्बल ५ ते ६ जणांनी तिच्यावर अत्याचार केले.

पाच जणांना अटक
हा प्रकार घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी पीडितेला शोधलं आणि तिची विचारपूस केली. तिने आपबिती सांगितल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. रेल्वे पोलीस अधीक्षक (SP) मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दर्शवलेल्या वर्णनावरून आणि प्रत्यक्ष ओळखीच्या आधारे मुख्य ऑटो चालकासह त्याच्या इतर चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.