🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औषध निरीक्षक परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सांगली, बुलढाणा आणि नवी मुंबईतून चौघांना बेड्या

औषध निरीक्षक परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सांगली, बुलढाणा आणि नवी मुंबईतून चौघांना बेड्या


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक (गट-ब)' पदभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. विशेष तपास पथकाने २४ सप्टेंबर रोजी गैरमार्गाने प्रश्नपत्रिका मिळवणाऱ्या दोन उमेदवारांसह दोन मध्यस्थांना अटक केली असून, या गुन्ह्यातील एकूण अटक आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. 

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक संवर्गातील एकूण १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा पार पडली होती. मात्र, या परीक्षेची गोपनीयता व निष्पक्षता भंग करून आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंचांची अनधिकृत देवाणघेवाण झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता , महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगली, बुलढाणा आणि नवी मुंबईतून ४ आरोपी ताब्यात

साजिद संदे (उमेदवार - सांगली येथून अटक)
विजय किंगर (उमेदवार - बुलढाणा येथून अटक)
संदिप खलाटे (मध्यस्थ/दलाल - नवी मुंबई येथून अटक)
भैरवनाथ कदम (मध्यस्थ/दलाल - नवी मुंबई येथून अटक)
यापूर्वी विशेष तपास पथकाने शिताफीने तपास करत आयोगाच्या गोपनीय कक्षातून प्रश्नसंचांच्या प्रती आर्थिक फायद्यासाठी बाहेर काढल्याप्रकरणी आयोगाचे अवर सचिव अभिजित लेंडवे, गोपनीय कक्षातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, 'कौटिल्य ॲकॅडमी'चे संचालक प्रवीण पाटील यांच्यासह मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक केली होती.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.