🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका; विधानसभा निवडणूक स्थगित करण्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका; विधानसभा निवडणूक स्थगित करण्याची मागणी


​देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून वाद सुरू असतानाच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. राजकीय अभ्यासक प्रथमेश गवाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. ​ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांचे आक्षेप डावलून घेतलेले १४ एकतर्फी निर्णय रद्द करण्याची आणि राज्यातील एसआयआर (SIR) प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 
तसेच या प्रक्रियेत वगळण्यात आलेली मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत आणि मतदार याद्यांमधील गोंधळ निवारण होईपर्यंत आगामी विधानसभा निवडणुका स्थगित ठेवाव्यात, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू, विवेक जोशी आणि राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.