🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर दरोडा: बंदुकीचा धाक दाखवून ३० लाखांची रोकड आणि दागिने लांबवले

जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर दरोडा: बंदुकीचा धाक दाखवून ३० लाखांची रोकड आणि दागिने लांबवले


​सांगली:  जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीजवळील भिवर्गी फाटा येथे मध्यरात्री एक अत्यंत थरारक घटना घडली. माडग्याळ येथील प्रसिद्ध मेंढ्यांच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी तामिळनाडूमधून आलेल्या १० व्यापाऱ्यांना अज्ञात दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​तामिळनाडूतील सालेम येथून आलेले हे व्यापारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास भिवर्गी फाटा परिसरात पोहोचले होते. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ६ ते ८ दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी बंदुकीचा आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडील २० लाखांची रोकड, २ तोळे सोने आणि मोबाईल फोन असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.

​घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा सुगावा लावण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या  आधारे तपास करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.