शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुर्लीचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद; फायनलमध्ये नागठाणेवर एकतर्फी मात!
बुर्ली :- स्थानिक प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल येथे आयोजित तालुकास्तरीय अंडर-१४ क्रीडा स्पर्धेत शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल, बुर्ली च्या १४ वर्षांखालील संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. १८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने नागठाणे हायस्कूलचा २०-१२ अशा फरकाने धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच शांतिनिकेतनच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि मजबूत पकड (टॅकल) करत नागठाणे हायस्कूलवर वर्चस्व गाजवले. कर्णधार वेदांत साळुंखे याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने शिस्तबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
विजेत्या संघात खालील खेळाडूंचा समावेश होता:कर्णधार: वेदांत साळुंखेसंघ सदस्य: संचित हवलदार, मस्तकिम इनामदार, वेदांत कोळेकर, अब्दुल्लाह फिरजाडे, आदर्श जाधव, शिवतेज चव्हाण, वेदांत जाधव, आरव शिंदे, प्रणव पाटील आणि जयवर्धन पाटील.या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक ज्ञानेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.वेदांत जाधवला रौप्य पदक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!तसेच २१ सप्टेंबर २०२६ रोजी क्रांती हायस्कूल, कुंडल येथे पार पडलेल्या वैयक्तिक क्रीडा प्रकाराच्या तालुकास्तरीय सामन्यांमध्ये शांतिनिकेतन स्कूलचा खेळाडू वेदांत जाधव याने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) पटकावला. या घवघवीत यशामुळे वेदांतची जिल्हास्तरीय (डिस्ट्रिक्ट लेव्हल) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या या दुहेरी यशामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, नागरिक व क्रीडाप्रेमींमधून विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक प्रशिक्षक ज्ञानेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.