🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'देशाचे सर्वात मोठे गद्दार!' SIR वरून १३ कोटी मतदारांची नावे हटवल्याने बॉम्ब; कॉकरोच जनता पार्टीचा ज्ञानेश कुमारांना ४८ तासांचा अल्टीमेटम!

​'देशाचे सर्वात मोठे गद्दार!' SIR वरून १३ कोटी मतदारांची नावे हटवल्याने बॉम्ब; कॉकरोच जनता पार्टीचा ज्ञानेश कुमारांना ४८ तासांचा अल्टीमेटम!


कॉकरोच जनता पक्षाने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना 48 तासांच्या आत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. पक्षाने म्हटले आहे की, जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर ते देशव्यापी आंदोलने सुरू करतील आणि त्यानंतर दिल्लीत निदर्शनेही करतील.

एसआयआर (SIR) संदर्भात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांचा हवाला देत पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपक म्हणाले, "ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. ते सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत." दीपक यांनी आरोप केला की, एसआयआरच्या माध्यमातून देशातील 13 कोटींहून अधिक मते रद्द करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. दीपक म्हणाले, "लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणे, पण ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोण मतदान करेल आणि कोण नाही हे सरकार ठरवत आहे."

ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही

अभिजित दिपके म्हणाले, ज्ञानेश कुमार देशाची लोकशाही व्यवस्था कमकुवत करत आहेत. ते मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोण मतदान करेल आणि कोण नाही हे सरकार ठरवत आहे. ही लोकशाही आहे का? तुम्ही लोकशाहीची संपूर्ण व्याख्याच बदलली आहे. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही आहे." त्यांनी सांगितले की, एकूण 13 कोटींहून अधिक मते वगळण्यात आली आहेत. हा काही लहान आकडा नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आघाडी यांच्यातील मतांचा फरक केवळ 2 टक्के होता. 13 कोटी मते वगळणे म्हणजे एकूण मतांच्या अंदाजे 13 ते 14 टक्के आहे. 2 टक्के मतांचे अंतर आणखी वाढवण्यासाठी आणि आपली सत्ता कधीही जाऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी ज्ञानेश कुमार मुद्दाम ही मते वगळत आहेत का? इतकी मते वगळण्याची काय गरज होती?

प्रादेशिक नेत्यांना एकेक करून पराभूत केल्याचे आरोप
2024 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवता आले नाही. '400 चा टप्पा ओलांडण्याची' घोषणा दिल्यानंतर त्यांना 240 जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर त्यांना जाणवले की देशाचा मूड बदलत आहे आणि प्रादेशिक शक्ती मजबूत होत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असोत, राष्ट्रवादी काँग्रेस, एम. के. स्टॅलिन, पिनारयी विजयन, अरविंद केजरीवाल, किंवा ममता बॅनर्जी हे सर्व मुख्यमंत्री एकामागून एक पराभूत झाले. हा केवळ एक योगायोग असू शकत नाही. यात एक विशिष्ट पॅटर्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

बंगालमध्ये, ममता बॅनर्जी यांच्या जागेवरून 50 हजार मते वगळण्यात आली आणि त्या सुमारे 15 हजार मतांनी पराभूत झाल्या. एम. के. स्टॅलिन यांच्या जागेवरून एक लाख मते वगळण्यात आली आणि ते सुमारे 45 हजार मतांनी पराभूत झाले. दिल्लीत, अरविंद केजरीवाल यांच्या जागेवरून 40 हजार मते वगळण्यात आली आणि ते सुमारे 4 ते 5 हजारांनी मतांनी पराभूत झाले. ही कारवाई केवळ प्रबळ विरोधी नेत्यांना संपवण्यासाठी केली गेली का? विरोधी पक्षाशी किंवा कोणत्याही विशिष्ट पक्षाशी आमचे कोणतेही विशेष नाते नाही. पण लोकशाहीत जर संपूर्ण विरोधी पक्षच संपवला गेला, तर त्याला लोकशाही म्हणता येईल का? ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक आहे का? निवडणूक? अशी विचारणा त्यांनी केली.
आमच्या मताला काही किंमत नाही

सौरभ दास म्हणाले, "ही व्यवस्था बदलायला हवी, पण ही व्यवस्था कशी बदलणार? तुमच्याकडे मत हे एकमेव साधन आहे. तेही काढून घेतल्यास बदल कसा घडून येईल? देशभरातील लोक आम्हाला विचारत आहेत की बदल कसा होणार, आमच्या मताला काही किंमत नाही. आता जो अहवाल समोर आला आहे, तो देशातील सर्व तरुणांनी वाचला पाहिजे." तुम्ही एसआयआरमधून 13 कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली. हा अहवाल काल आणि पुन्हा आज आला. गेल्या 10 महिन्यांत निवडणूक आयोगातील 14 आक्षेप नोंदवण्यात आले. इतर दोन निवडणूक आयुक्तांनी फाईलमध्ये अनेक बेकायदेशीर बाबी असल्याचे नमूद केले आणि सर्व काही ठीक नसल्याचे सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.