पुण्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत, उत्साहात पार पडावा. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात गणेशोत्व काळात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. 3 एरियांमध्ये तर तब्बल 10 दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील 3 एरियांमध्ये 10 दिवसांच्या ड्राय डे च्या कालावधीत कुठेच दारु मिळणार नाही.
14 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण पुण्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आणि 25 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी दिवशी मद्य विक्री बंद राहणार आहे. तसेच गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी होणाऱ्या शहरातील ठराविक विसर्जन मार्गावरील सर्व मद्य विक्री करणारे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
26 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकी पर्यंत पुण्यातील मद्य विक्रीचे सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्याची हद्द गणेशोत्सवातील सर्व दिवस कोरडा क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारु विक्री बंदीचा आदेश जाहीर केला आहे.
10 दिवस कडकडीत दारु बंदी
मध्य पुण्यातील अतिसंवेदनशील 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवाचे सर्वच्या सर्व 10 दिवस 'कोरडा क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या 3 पोलीस ठाण्यांची संपूर्ण हद्द 'ड्राय झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने, बार व परमिट रूम्स गणेशोत्सवाचे सर्व 10 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई आदेशानुसार एफएल-2, एफएल-3, सीएल-3, एफएलबीआर-2, फॉर्म ई, फॉर्म ई-2 आणि टी.डी-1 या सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या (दुकाने, बार आणि परमिट रूम) संबंधित दिवशी आणि भागात पूर्णपणे बंद राहतील. संपूर्ण पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका निघतील, त्या सर्व मार्गांवरील मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आदेशाचे कडक पालन करण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.