🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या साखराळे गावात गणेश आरतीदरम्यान फटाके वाजवण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले असून पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सांगलीच्या साखराळे गावात गणेश आरतीदरम्यान फटाके वाजवण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले असून पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


ईश्वरपूर : गणेश मंडळाच्या आरतीदरम्यान फटाके वाजवण्याच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. तलवार, लोखंडी रॉड आणि चेनवेल रॉडने केलेल्या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साखराळे (ता.वाळवा) येथील ए-वन चौकात घडली. याप्रकरणी अरविंद जगन्नाथ पाटील (वय ४०, रा. साखराळे) यांनी दोन दिवसांनंतर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर सुतार, अनुज सुतार, गणेश माने आणि कुमार सुतार यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे आई, पत्नी आणि मंडळाच्या सदस्यांसह गणेशाची आरती करीत होते. त्यावेळी जुन्या फटाक्यांच्या वादातून गणेश माने याने तलवारीने हल्ला सुरू केला. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या शुभम सुतार यांच्या डाव्या हातावर तलवारीने वार करण्यात आला. सागर सुतार याने चेनवेल रॉडने अरविंद पाटील यांच्या डोक्यात, तर अनुज सुतार याने लोखंडी रॉडने हल्ला केला. गणेश माने याने पाटील यांच्या हाताच्या बोटांवर व पंजावर तलवारीने वार करून छातीला चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पाटील यांच्या आईच्या डोक्याला व हाताला, पत्नी ज्योती यांच्या बोटांना मारहाण झाली. मध्यस्थी करणारे दीपक सर्जेराव पाटील यांच्या दंडावर तलवारीचा वार झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. आरतीत मध्यस्थी करणाऱ्यांनाही मारहाण या हल्ल्यात अरविंद पाटील, शुभम सुतार, अरविंद पाटील यांच्या आई व पत्नी ज्योती तसेच दीपक पाटील असे पाच जण जखमी झाले. आरती सुरू असताना झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्यांनाही हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.