🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीषण वास्तव! लैंगिक संबंधांमधील 'ही' एक घातक सवय नडली; या देशात HIV चा उद्रेक, इमर्जन्सीसारखी स्थिती!

भीषण वास्तव! लैंगिक संबंधांमधील 'ही' एक घातक सवय नडली; या देशात HIV चा उद्रेक, इमर्जन्सीसारखी स्थिती!


जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक असलेल्या फिजीने एचआयव्हीला राष्ट्रीय संकट म्हणून घोषित केले आहे. या देशामध्ये एचआयव्ही बाधितांच्या संख्येत 27 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पॅसिफिक समुद्रातील बेटवजा देशात एचआयव्ही वेगाने पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षाचे आकडे काय सांगतात?

फिजी सरकारने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात याबद्दलची माहिती दिली आहे. 2025 मध्ये 2016 लोकांना एचआयव्हीचे निदान झाले होते. या छोट्याश्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता येथे दर 60 प्रौढांपैकी एक जण या आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज सरकारने बांधला आहे. गेल्या वर्षी या देशातं 59 बाळांचा जन्म एचआयव्ही संक्रमणासहीत झाला. त्यापैकी 18 जण एक वर्षही जगली नाहीत, असेही सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

देशातील सरकारकडून अनेक उपाययोजना
चाचण्यांची संख्या आणि व्याप्ती वाढवल्याने मोठ्या प्रमाणात संसर्गबाधित सापडत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी लवकर निदान होत असल्यामुळे लवकर उपचार करणे शक्य झाले आहे. फिजी आता मोफत, ऐच्छिक आणि गोपनीय चाचण्यांची सोय उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे, अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेणाऱ्यांसाठी हानी-कमी करणाऱ्या सेवा आणि उपचारांची उपलब्धता वाढवण्याची योजना या छोट्याश्या देशातील सरकार आहे.
एड्स अजून संपलेला नाही, असा इशारा

युएनएडएस (UNAIDS) नुसार, सुमारे 9 लाख लोकसंख्या असलेला फिजी देश, नवीन संसर्ग होत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर जगातील सर्वात तीव्रतेने रुग्ण संख्या वाढत असलेला देश आहे. असा अंदाज आहे की गेल्या वर्षी 9100 फिजीयन नागरिक एचआयव्हीने ग्रस्त होते. यापैकी केवळ 39% लोकांना आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची कल्पना होती. "फिजीने या क्षणी देशातील सार्वजनिक आरोग्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे ओळखलं आहे. त्यांनी आता आपल्या प्रतिसादाचा वेग वाढवला असून पुढेही तो अधिक वाढवत आहेत," असे युएनएड्सच्या कार्यकारी संचालक विनी ब्यानिमा म्हणाल्या. "एड्स अजून संपलेला नाही, असा इशारा या माध्यमातून जगाला दिला जातोय," असंही ब्यानिमा यांनी म्हटलं आहे.

लैंगिक संबंधातून संसर्ग
फिजीमधील ज्या प्रकरणांमध्ये संसर्ग कसा झाला याची माहिती उपलब्ध आहे त्या आकडेवारीनुसार, येथील लोकांच्या लैंगिक आयुष्याशीसंबंधित सवयी यामागील मुख्य कारण आहे. निम्म्याहून अधिक प्रकरणांमध्ये एचआयव्हीचा संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. लैंगिक संबंध ठेवताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याची चूकच एचआयव्ही संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आकडेवारीतून दिसून येतंय. तसेच 42% पेक्षा जास्त एचआयव्ही प्रकरणे इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित होती, असे युएनएड्सने म्हटले आहे.
पाच मंत्र्यांची एक कॅबिनेट उपसमिती

एचआयव्ही विरुद्ध लढण्याच्या कारवाईतील अडथळे दूर करण्यासाठी सरकारने पाच मंत्र्यांची एक कॅबिनेट उपसमिती स्थापन केली आहे. एचआयव्हीने ग्रस्त असलेल्या लोकांविरुद्ध भेदभाव करणे फिजीमध्ये बेकायदेशीर आहे आणि देशभरात उपचाराच्या सेवा उपलब्ध आहेत, असेही सरकारने म्हटले आहे.

या देशात दर 35 लोकांमध्ये एक एचआयव्हीग्रस्त
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, फिजीमधील दर 60 प्रौढांमागे एक व्यक्ती एचआयव्हीने ग्रस्त असण्याचा अंदाज आहे. आफ्रिकेतील काही भागांपेक्षा दर 35 प्रौढांमागे एक व्यक्ती एचआयव्हीने ग्रस्त आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.