"देशाच्या पंतप्रधानांचा अवमान खपवून घेणार नाही!" CJP ला हायकोर्टाचा दणका, अभिजित दिपकेसह चौघे रडारवर!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका महिलेचे अश्लील स्वरूपात दाखवणारे AI-निर्मित डीपफेक फोटो सार्वजनिक आंदोलनांदरम्यान प्रसारित करण्यात आल्याच्या आरोपांप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने राजकीय कार्यकर्ते सौरव दास, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे.
एका महिलेने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. महिलेने आपली वैयक्तिक छायाचित्रे परवानगीशिवाय वापरून AIच्या माध्यमातून त्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाला 'सार्वजनिक चारित्र्यहनन आणि सायबर हल्ला' असे संबोधत न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आक्षेपार्ह पोस्ट सर्व डिजिटल माध्यमांवरून 24 तासांच्या आत हटवण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर याचिकाकर्त्या महिलेला तातडीने पोलिस संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
डीपफेक प्रकरणाची गंभीर दखल
न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले. एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय तिच्या प्रतिमेचा अशा प्रकारे गैरवापर केल्याने संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होतोच, पण देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाशी संबंधित प्रतिमेचाही गैरवापर होतो, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यात देशाचे पंतप्रधान थेट संबंधित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे तपास यंत्रणा या प्रकरणाची पूर्ण संवेदनशीलतेने चौकशी करेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
महिलेने जीव आणि बलात्काराच्या धमक्यांचा आरोप .
याचिकेनुसार कॉकरोज जनता पार्टी शी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी महिलेचा वैयक्तिक फोटो तिच्या परवानगीशिवाय मिळवला. त्यानंतर AIमधील फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तिचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाच्या छायाचित्रांमध्ये जोडण्यात आल्याचा आरोप आहे.
याचिकेत पुढे दावा करण्यात आला आहे की, या मॉर्फ केलेल्या सामग्रीचे भौतिक बॅनरही तयार करण्यात आले. हे बॅनर मोठ्या सार्वजनिक आंदोलनांमध्ये आणि जंतर-मंतर येथे प्रदर्शित करण्यात आले. त्यावेळी लैंगिक स्वरूपाचे आक्षेपार्ह घोषवाक्य देण्यात आल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यानंतर ही सामग्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तसेच काही अश्लील वेबसाइट्सवर पद्धतशीरपणे अपलोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.