🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"न्यायाची हीच का भेट?" ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण जाहीर होताच भाजप नेत्याची तिखट टोलेबाजी; जखमेवर चोळले मीठ!

"न्यायाची हीच का भेट?" ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण जाहीर होताच भाजप नेत्याची तिखट टोलेबाजी; जखमेवर चोळले मीठ!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशात वातावरण तापलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेसने तर आज दिल्लीत जोरदार निदर्शने करून ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

मात्र, दुसरीकडे भाजपच्या एका बड्या नेत्याने ज्ञानेश कुमार यांचं समर्थन केलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र आणि शांततापूर्ण निवडणूक घेण्यात तसेच व्होटर लिस्ट दुरुस्त करण्यात ज्ञानेश कुमार यांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना या कामाबद्दल कमीत कमी पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पाहिजे, असं समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पार्टी राहुल गांधींनी सीरिअसली घेत नाही. त्यामुळे तुम्ही तरी का राहुल गांधींच्या गप्पा मारता. ज्ञानेश कुमार यांचं योगदान मोठं आहे. त्यांना कमीत कमी पद्म भूषण पुरस्कार दिला पाहिजे. इतक्या वर्षानंतर राज्यात शांततेत आणि कोणत्याही दहशतीशिवाय मतदान पार पडलं. यामुळे पश्चिम बंगालची जनता खूश आहे. राज्यात कोणतीही हत्या झाली नाही. निर्भयपणे लोकांना मतदान करता आलं, असं समिक भट्टाचार्य म्हणाले.

विरोधकांचा हल्ला सुरूच

एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांना धारेवर धरलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिलेला असतानाच भाजपच्या नेत्याने त्यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ज्ञानेश कुमार यांची पोलखोल केली आहे. निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयाला गेल्या 10 महिन्यात 14 वेळा हरकत घेतली होती. मात्र, तरीही एसआयआरशी संबंधित निर्णय परस्पर घेण्यात आले, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे. म्हणजेच ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयोगात मनमानी सुरू होती, हे उघड झालं आहे.

काँग्रेससह देशातील सर्वच विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.