🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! धामणी आणि अंकलीत अवैध मटक्याचा उघडाडोळा धुमाकूळ; पोलिसांच्या मेहेरबानीने बुकी मालामाल, गोरगरीब कंगाल!​

सांगली दर्पण Exclusive! धामणी आणि अंकलीत अवैध मटक्याचा उघडाडोळा धुमाकूळ; पोलिसांच्या मेहेरबानीने बुकी मालामाल, गोरगरीब कंगाल!


​सांगली :- धामणी आणि अंकली परिसरात सध्या बेकायदेशीर मटका आणि जुगाराचा अजस्र विळखा घट्ट झाला असून, स्थानिक पोलीस प्रशासनाचा धाक पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. गल्लीबोळातील टपऱ्या आणि खोक्यांमध्ये उघडपणे चालणाऱ्या या काळ्या धंद्यामुळे सामान्य आणि गरीब कुटुंबांची आर्थिक घडी पार विस्कटली आहे.

​टपऱ्यांवर मटक्याची दुकानदारी; तरुणाई आणि बेरोजगार जाळ्यात
प्रत्यक्ष पाहणीत समोर आलेल्या धक्कादायक वास्तव्यानुसार, दोन्ही गावांतील प्रत्येक लहान-मोठ्या टपरीवर आणि खोक्यात मटका उघडपणे घेतला जात आहे. विशेषत: रोजगाराच्या शोधात असलेली तरुणाई आणि बेरोजगार नागरिक या सट्टयाच्या आमिषाला बळी पडत आहेत. आकडा लागल्यास जेमतेम ५०० ते १००० रुपयांचे किरकोळ आमिष दाखवून रोज हजारो रुपयांची लूट केली जात आहे. या दुष्टचक्रात गरीब अधिकच दरिद्री होत असून, मुख्य मटका बुकी मात्र मालामाल होत आहेत.
​‘अर्थपूर्ण’ व्यवहारांमुळे पोलीस गप्प? ग्रामस्थांचा थेट सवाल

या संपूर्ण अवैध धंद्यामागे मोठे ‘अर्थकारण’ आणि हप्तेबाजी चालत असल्याचा थेट आरोप आता ग्रामस्थांमधून होत आहे. पोलीस यंत्रणा सर्वकाही माहिती असूनही डोळेझाक करत असल्याने बुकी बिनधास्तपणे कारभार हाकत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर आणि निष्क्रीयतेवर धामणी व अंकलीतील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​तातडीने धडक कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा!
गरिबांची होणारी उघडीनागडी लूट थांबवण्यासाठी सांगलीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. धामणी आणि अंकलीतील मटका अड्डे उध्वस्त करून संबंधित बुकींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलिसांनी वेळीच पावले उचलली नाहीत, तर तीव्र जनआक्रोश आणि आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.