🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! संजयनगरला अवैध धंद्यांचा विळखा: 'पुजाऱ्या'च्या आशीर्वादाने ऑनलाईन कॅसिनो अन् मटका जोरात; स्थानिक नागरिकांचा संताप!​

सांगली दर्पण Exclusive! संजयनगरला अवैध धंद्यांचा विळखा: 'पुजाऱ्या'च्या आशीर्वादाने ऑनलाईन कॅसिनो अन् मटका जोरात; स्थानिक नागरिकांचा संताप!
​

सांगली :-संजयनगर परिसरात सध्या ऑनलाईन कॅसिनो आणि मटक्याचा महापूर आला असून संपूर्ण परिसर अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट बनला आहे. या सगळ्या काळ्या बाजारामागे 'पुजारी' नावाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिक उघडपणे करत आहेत. "या पुजाऱ्याची पूजा केल्याशिवाय पुढील कोणतीही पूजा पार पडत नाही," असा उपरोधिक टोला लगावत, या पुजाऱ्याला आता त्र्यंबकेश्वरालाच पूजा घालायला पाठवण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

​गेल्या काही दिवसांपासून संजयनगरमध्ये जुगार, मटका आणि ऑनलाईन कॅसिनोसारखे नशायुक्त व बेकायदेशीर धंदे उघडपणे सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वीच या प्रकाराबाबत तीव्र आवाज उठवूनही परिस्थिती जैसे थे आहे. "पुजाऱ्याच्या आशीर्वादानेच हा सगळा खेळ चालू असून, पोलीस किंवा प्रशासनातील कोणती मोठी ताकद या पुजाऱ्याच्या पाठीशी उभी आहे?" असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

​युवा पिढी या अवैध धंद्यांच्या आणि नशेच्या आहारी जात असून अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या 'पुजारी' नावाच्या मास्टरमाईंडचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आणि संजयनगर परिसराला या नशेच्या आणि जुगाराच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी आता संजयनगरमधील स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित कडक कारवाई न केल्यास नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.